Wani : नांदेपेरा ते शेलू या मुख्य रस्त्याची दुरवस्था झाली असून ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हा परिषद उपकार्यकारी अभियंत्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. प्रशासनाने ३ सप्टेंबरपर्यंत रस्त्याच्या दुरुस्तीला सुरुवात न केल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
या मार्गावरून शेतकरी, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच शेलू येथील मंदिरात जाणाऱ्या भाविकांची नियमित वर्दळ असते. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. यापूर्वीही रस्त्याच्या दुरुस्तीसाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात आला होता. निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांना देण्यात आल्या आहेत. यावेळी मनसे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार, धिरज पेचे, प्रदीप बदकल, प्रवीण मांडवकर, सुरज गावंडे, रुपेश जोगी, गणेश मोहितकर, शुभम मस्की, संदीप काकडे, देविदास आवारी, निखिल दानव, वनिता आवारी, युवराज आवारी, योगेश नांदेकर, संजय वासेकार, विजय डवरे, किशोर सूर, रोहित झोडे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

