•भयानक असा काय आहे प्रकार जाणून घेऊया.
अजय कंडेवार,वणी :- पोलिस हे आपात्कालिन परिस्थितीसाठी नेहमी तत्पर असतात. अराजक तत्वांवर नियंत्रण ठेवून शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे काम केले जाते. शहरात मोठ्या अनुचित घटना घडल्यास त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठीचे सरावही केला जातो. असाच काहीसा सरावाचा प्रकार बुधवार दिनांक 29 मार्च ला अचानकपणे पोलिसांनी घडवून आणला. दुपारच्या सुमारास वणी पोलिसांनी शहरातील मध्यभागी दिपक चौपाटी येथे यशस्वी सराव #(Mock Drill)@ केला आहे. हा बनावटी नाट्य(निषेध प्रदर्शने) (nos )करीत काही मिनिटात त्यांनी हा पूर्वनियोजित कट उधळून लावला. या नाट्यक्रमाचा भाग असलेल्या रोखलेल्या तैनात पोलीस कर्मचारी बंदुकांसह त्या प्रदर्शनकाऱ्याना ताब्यात घेतले . मात्र, या सरावाचे काही नागरिकांनी मोबाईलमध्ये चित्रीकरण केले आणि समाजमाध्यमांवर टाकले. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले. मात्र, हा ‘ वणी पोलीसांचा मॉक ड्रील‘ होता. त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही. समाज माध्यमांवर येणाऱ्या कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन पोलिस प्रशासनाने नंतर जाहीर केले.Riot on Deepak Chowpatty…….! Fulfill our demands…Let’s find out what kind of horror it is@.(Mock Drill)#
सविस्तर,रामनवमी ,रमजान व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतनिमित्त च्य पार्श्वभूमीवर बुधवार दिनांक 29 मार्च 2023 ला वणी पोलिसांच्या वतीने मामाचौक येथे मॉक ड्रील करण्यात आली. यावेळी दंगा नियंत्रक पथक व पोलिसांनी दंग्यावर नियंत्रण आणण्याची विविध प्रात्यक्षिके दाखविली.शहर पोलिसांच्या वतीने बुधवारी दिनांक 29 मार्च 2029 ला शहरातील दिपक चौपाटी येथे अचानक पोलिसांच्या गाड्या आल्या. या गाड्यामधून एका मागे एक पोलीस अधिकारी उतरल्याने एकच खळबळ उडाली. त्यानंतर पोलिसांनी प्रात्यक्षिके दाखविणे सुरु केले. यावेळी दंग्यावर नियंत्रण आनण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांनी प्रात्यक्षिके दाखविली.
वरिष्ठ यांचा आदेशाने उपविभागीय अधिकारी संजय पुज्जलवार यांच्या मार्गदर्नाखाली ठाणेदार प्रदीप शिरस्कर सपोनी माधव शिंदे वाहतूक शाखा प्रमुख सपोनी संजय आत्राम सर्व पोलीस कर्मचारी , पोऊनि प्रविण हिरे, पोऊनी आशिष झिमटे, पोउनी भादीकर, दंगा पथक व समस्त पोलीसांची उपस्थिती होती.