•विविध पक्षात पडले खिंडार, मनसेत असंख्य युवकांच्या प्रवेश…..
•स्थानिक “गावपुढारी”राजकीय खेळी खेळण्यात व्यस्त.
अजय कंडेवार,वणी: मनसेने आपली ताकद वाढवायला लागलीय. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका डोळ्यांसमोर ठेऊन, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांच्या अध्यक्षतेखाली तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा मार्गदर्शनात प्रत्येक पदाधिकारी इनकमिंगवर जास्त भर देत आहे. त्याचाच एक मोठा धमाका म्हणून राजूर गावातील मनसे उपाध्यक्ष थॉमस कोमलवार यांनी गावातील अनेक मोठ मोठ्या ,नामांकित व्यक्तींना मनसेची विचारधारा पटवून दिली तसेच गावातीलच भाजपचा एक विश्वासू पदाधिकारी मानलें जाणारे शंकर बोरगलवार यांच्यासह असंख्य युवकांनी व महिलांनी प्रवेश घेतला.


आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपल्या आहेत त्यातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा बोलबाला असलेल्या वणी विधानसभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये जोरदार इन्कमिंग पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे काम अतिशय झपाट्याने चालू आहेत वणी विधानसभेत पूर परिस्थिती निर्माण झाली .त्यावेळी सर्वप्रथम महाराष्ट्र नवनिर्माण सेना च पूर्वी त्यासाठी धावून गेली त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नावाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शेतकऱ्यांकरिता दत्तक योजना ही चालू करण्यात आली. या सर्व कामाचा झपाट चालू असताना आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत पुन्हा एकदा राजूर येथील असंख्य युवक व गावकऱ्यांनी प्रवेश केला . हा पक्षप्रवेश हा लोकांच्या या पाठबळाला अधिक ताकद दिल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास यावेळी राजूर ग्रामवासीयांनी व्यक्त केला.


“विशेष म्हणजे मनसेने वणी, मारेगाव तालुक्यात पक्षप्रवेश मेळावेच घेतले आहे. यात आतापर्यंत विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मनसेत प्रवेश केल्याची माहिती आहे. तसेच आणखी अनेक स्थानिक नेते आणि कार्यकर्ते मनसेत प्रवेश केला आहे.तसेच राजूर येथे विविध पक्षात पडले खिंडार पडल्याचे चित्र देखील पहावयास मिळत आहे. राजूर येथील मनसेत असंख्य युवकांसह एकेकाळी भाजपाचे राजूर येथील विश्वासू मानले जाणारे शंकर बोरगलवार यांचाही जंगी प्रवेश झाला. त्यात थॉमस व अरबाज ने खूप परिश्रम करीत असल्याचं कळत.गावात चालत असलेला घडामोडींवर विशेष म्हणजे स्थानिक “नेते ” खेळी खेळण्यात व्यस्त असल्याची चर्चा ही यात दिसुन येत आहे. “कोण मिलेगा सपाटे मे..”अशी भूमिका पहावयास मिळत आहे. परंतू या युवकांच्या मागें राहून काहीं गावपुढारीच” कुणीगेम तर. करीत नाही ना “…. अशेही गावात बोलल्या जात आहे .

या कार्यक्रमाला उपस्थितीती म्हणून समस्त मनसे पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते होतें. या कार्यक्रमाचा यशस्वीेतेकरीता मनसे अध्यक्ष अरबाज खान, उपाध्यक्ष थॉमस कोमलवार,सचिव अराफत खान, विवेक निमसटकर व कार्यकर्त्यांचे सहकार्य लाभले.

