•नाशिक जवळील घटना
नागेश रायपूरे,मारेगाव:- नाशिक नजीक घडलेल्या ट्रॅव्हल्स ट्रकच्या त्या भीषण अपघातातील घटनेत बारा मृतका पैकी मारेगाव तालुक्यातील मांगरुळ येथील एका सतरा वर्षीय युवकाचा सुद्धा समावेश असल्याचे उघडकीस आले असुन,अजय मोहन कुचनकर (17)असे मृतकाचे नाव आहे.
मृतक अजय कुचनकर चे कुटूंब तालुक्यातील मांगरुळ येथील रहिवासी आहे.त्याच्या कुटूंबातील वडील,आजी आजोबा,काका काकु ही मांगरुळ येथे वास्तव्य करत असुन आई दुर्गा (33) व बहीण कु.साक्षी (14) ही मुबंई येथे एका कंपनीत कामाला आहे.दिवाळी सणा निमित्त तो आई व बहिणीला काल यवतमाळ वरुन मुबंई साठी एका खाजगी ट्रॅव्हल्स ने निघाला होता.
परंतु शनिवारच्या पहाटे 4 वाजताचे दरम्यान मुबंई कडे जात असतांना नाशिक जवळ त्या ट्रॅव्हल्स ट्रक चा भीषण अपघात झाला.या भीषण अपघातात त्या ट्रॅव्हल्स ला चक्क आग लागली होती. या दुर्दैवी घटनेत जवळपास बारा प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले. यापैकी चार व्यक्तीची ओळख पटल्याची माहिती समोर येत असुन त्यापैकी मारेगाव तालुक्यातील मांगरुळ येथील अजय मोहन कुचनकर (17)या युवकाचा सुध्दा समावेश असल्याचे उघडकीस आले आहे.या घटनेमुळे अवघ्या परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.