•नव्या कंत्राटदारांना काम मिळू नये म्हणून असा हा कट.
•शिवसेनेच्या निवेदनातून घणाघाती आरोप
अजय कंडेवार,वणी:- अतिरिक्त नियमबाहय अटी आणि नियम लावून काढण्यात आलेली घनकचरा व्यवस्थापन कामाची निविदा रद्द करून अटी तात्काळ शिथील करण्यात यावी, जेणेकरुन स्थानिक भुमिपुत्रांना काम करण्याची संधी प्राप्त होईल याकरिता शिंदे गटाचे वणी शहर प्रमुख ललित लांजेवार यांनी नगरपरिषद मुख्याधिकारी यांना 12 फेब्रुवारी रोजी देण्यात आलेल्या निवेदनातून मागणी केली आहे.

वणी नगरपरिषद कार्यक्षेत्र अंतर्गत शहरातील सर्व घनकचरा व्यवस्थापनासाठी नगर परिषद कार्यालयाकडून निविदा प्रकाशित करण्यात आली होती. या निविदेत गरज नसताना अनेक नियम आणि अटी लादुन निविदा धारकांना अडचणीस आणण्याचे आणि आपल्या मनमर्जीतिल कंत्राटदारांना हे काम देण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे दिसुन येते.
निविदेच्या अनुषंगाने निविदा धारक हे भागिदारी व्यवसायिक नसावे असा उल्लेख करण्यात आला आहे. सदर नियम अद्याप कुठल्याही निविदेत आजवर निदर्शनास आली नाही आणि हा विषय संबंधित कंपनीचा व वयतिक विषय असुन त्यात १ किंवा अनेक भागीदार असु शकता.सदर काम हे आरोग्य विषयक व स्वच्छतेचे असुन या कामाकरीता जिवन प्राधिकरणची नोंद मागविण्यात आली आहे. सदर अटीचा उद्देश काय असुन हि अट कोणत्या आधारावर शासन निर्णयावर आणि नगर विकास विभागाच्या नुसार लावण्यात आली आहे हा प्रश्न या ठिकाणी उद्भवितो. सदर नोटीस हि ६ महिण्याच्या कालावधीत असुन त्यामध्ये अखंड ३ व ५ वर्षाचा अनुभव मागण्यात येत आहे ?वेगवेगळ्या ४ नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांचा ५ वर्षाचा अनुभव प्रमाणपत्र मागण्यात आले आहे. सदर अट हि अद्याप कुठल्याही निविदेत टाकण्यात आली नाही. त्यामुळे नविन उद्योजकांकडे सर्व साधनसामग्री आणि मनुष्यबळ असतांना सुध्दा नव्या कंत्राटदारांना हे काम मिळावे नाही यासाठी आपण अशा अटी टाकुन हे काम आपल्या मनमर्जीतिल कंत्राटदाराला देण्याचे काम आपण करत आहे. असा घणाघाती आरोप निवेदनातून केला आहे.
संपूर्ण वणी शहराची घनकचरा व्यवस्थापनासंबंधी पाहणी केल्याचे स्वच्छता निरीक्षक / अभियंता / मुख्याधिकारी यांचे Geo-Tagging प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक राहील. ही २० क्रमांकाची अट जाणुनबुजुन घातल्याचे निदर्शनास येत आहे.या सर्व अटी आणि नियमांवरुन सदर निविदा ही आर्थिक देवाण-घेवाणीतुन मॅनेज केल्याचा स्पष्ट आरोप निवेदनातून करण्यात आले आहे. आजवर कोणत्याही निविदा मॅनेज करुन काम देण्यात आली नाही. आपण या अतिरिक्त अटी तात्काळ शिथील करुन हि निविदा रद्द करण्यात यावी, जेणेकरुन स्थानिक भुमिपुत्रांना काम करण्याची संधी प्राप्त होईल अन्यथा शिवसेनाच्या वतीने तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल. असा इशारा देण्यात आला.

