•सुशिक्षित युवकांनी दाखविले काँग्रेसकडे कल..
•पुन्हा राजूर गाव काँग्रेसमयी होण्याचा मार्गावर
अजय कंडेवार,वणी:- राष्ट्रीय काँग्रेस कमिटी वणी द्वारा कायर येथे आयोजित भव्य मोफत आरोग्य शिबीर कार्यक्रमात खासदार बाळुभाऊ धानोरकर, माजी आमदार मा. वामनराव कासावार, डॉ. महेंद्रसिंग लोढा व डेनीभाऊ संड्रावार यांचे हस्ते राजूर येथील सुशिक्षित युवकांचा जाहीर प्रवेश झाला.
त्यात राजूर येथील युवक ॲड.अरविंद सिडाम, दीपक मस्के, संदीप सिडाम, गौतम ठमके, दीपक जांभूळकर, मितराज नैताम, मदन पथाडे व इतर यांचा काँग्रेस मध्ये प्रवेश घेण्यात आला.
काँग्रेस पक्ष हा सर्व समाजाला बरोबर घेऊन जाणारा पक्ष असून संविधानात असलेल्या समतेच्या वाटेवरून मार्गक्रमण करणारा पक्ष आहे. समाजातील पददलितांना न्याय देण्याचा पक्षाचा प्रयत्न राहिला आहे. यांच्या पक्ष प्रवेशाने काँग्रेस पक्षाला आणखी बळ मिळेल असंही डेनी संड्रावार यांनी सांगितलं.