•नरेगा अंतर्गत राबवण्यात आला उपक्रम.
देव येवले,झरी(वा.) संपूर्ण महाराष्ट्रात राबवत असलेल्या दसवार्षिक नियोजन आराखडा संदर्भात आज तीन दिवशीय ग्राम रोजगार सेवकांचे प्रशिक्षण शिबिर संपन्न झाले. हे शिबीर झरी तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती झरी येथे पार पडले.
या शिबिराच्या माध्यमातून दसवार्षिक नियोजन आराखडा काय आहे. यामध्ये ग्राम रोजगार सेवकाची भूमिका आहे असते. ग्राम रोजगार सेवकांच्या माध्यमातून गावाचा विकास कसा साधू शकतो. व आपल्या गावात नवनवीन योजना राबवून गावाचा विकास कसा करायचा व दसवार्षिक कृती आराखडा बनवून गावातच गावातील लोकांना कसे काम द्यायचे. शिवारफेरी करून शेतात कामे कसे कराचे व गाव फेरी घेऊन गावात कोणत्या कामाची गरज आहे व ते कसे करायचे बाबत या प्रशिक्षणात मार्गदर्शन करण्यात आले. या शिबिरात कौटुंबिक सर्वे कसा करायचा याचे प्रात्यक्षित मांगुर्ला या गावात घेण्यात आला होता.
या शिबिरास प्रशिक्षक संजय अग्रवार, संतोष पांडे, बालाजी गोरे यांनी भूमिका पर पाडली. तर
नंदकुमार सर (रोहोयो सचिव), गोयल सर (आयुक्त नरेगा नागपूर), आर. सागळे (गटविकास अधिकारी) यांचे मार्गदर्शन लाभले. झरी येथील नरेगा कर्मचारी बालाजी चव्हाण (एपिओ), खारकर सर (पिटिओ), शुभम भारशंकर (पिटिओ), संतोष मेंढे (सीडीओपी), राजू कर्नेवार, दिन बहुउद्देशीय संस्थेचे संचालक इरफान शेख व तालुक्यातील संपूर्ण ग्राम रोजगार सेवक यांनी या शिबिरास उपस्थिती दर्शविली.