•वणीतील जेष्ठ पत्रकार राजू धावंजेवार यांचा त्या सहचारिणी होत्या.
अजय कंडेवार,वणी:- शहरातील रंगारीपुरा येथील रहिवासी ज्योती राजु धावंजेवार 57 वर्ष यांचे दिर्घ आजाराने शनिवारी रात्री 11.30 वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला.वणीतील जेष्ठ पत्रकार राजु धावंजेवार यांची ती पत्नी होती. ज्योती धावंजेवार यांच्यावर मागिल 3 महिन्यांपासून नागपूर येथील मेडिकल रुग्णालयात उपचार सुरू होते. अचानक 27 जाने शनिवारी रोजी रात्री 11.30 वाजता शेवटचा श्वास घेतला.ता.29 जाने सोमवार रोजी सकाळी ठीक 10 वाजता वणी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंतीमसंस्कार करण्यात येणार आहे.यांचे मागे पती,मुलगी,मुलगा असा मोठा आप्त परिवार आहे.या दुःखद घटनेमुळे धावंजेवार कुटुंबियांवर दुःखाचे डोंगर कोसळले आहे.
🟢“विदर्भ न्युज “परिवाराकडून भावपूर्ण श्रध्दांजली…💐💐💐💐