अजय कंडेवार,वणी :- जन्नत संघ व आमेर संघात रविवारी 3 वाजता फायनल चा सामना रंगणार आहे. दोन्ही संघात अटपैलू खेळाडूची भरमर आहे. जन्नत कडून अक्षय धावंजेवार, अक्षय ढेंगळे, प्रणय शेंडे या खेळदुसारखे अस्तपैलू खेळाडू आहेत. ज्यातील एकही खेळाडू सामना पालटविण्याची क्षमता ठेवतो. शिवाय सैफुर रहेमान व हर्ष भारवानी सारखे सुपर फास्ट गोलंदाज आहेत.
तर आमेर संघाकडून कर्णधार रवी राजूरकर फटक्यांची आतिषबाजी करण्याकरिता प्रसिद्ध आहेत. काही वेळ खेळपट्टीवर टिकल्यास रवी राजूरकर एकटाच सामना फिरवू शकतो. याशिवाय तोसिफ खान, तनविर अली यासारखे विस्फोटक फलंदाज आमेर संघाकडे आहेत.
ज्यांच्यात कोणत्याही गोलंदाजाला फोडून काढण्याची क्षमता आहे. यांच्याशिवाय संदीप मांढरे, संदीप खिरटकर यासारखे अस्तपैलू खेळाडू आहेत जे गोलंदाजी व फलंदाजीत सामन्याचा निकाल बदलवू शकतात.