अजय कंडेवार,वणी : स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, स्त्रीयांच्या मुक्तीदात्या, प्रथम महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे शिक्षणातील योगदान खूप मोठे आहे. त्यांनी दिलेले शैक्षणिक योगदान, त्यांनी आचरणात आणलेली स्री उद्धारासाठीची मुल्ये व त्यांनी रुजवलेली शैक्षणिक मूल्ये पुढील पिढीत संक्रमित करण्यासाठी ३ जानेवारी हा त्यांचा जन्मदिवस राज्यात ‘महिला शिक्षण दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो.
यावेळी कार्यक्रमात जनता विद्यालय वणी च्या मुख्याध्यापिका एम. डी. जोगी व उपमुख्याध्यापक डी. एस.बोबडे व पर्यवेक्षक व्ही. एस. आसूटकर उपस्थित होते.क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे बहुजन समाजाकरीता मोठे योगदान आहे, असे यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका एम.डी.जोगी म्हणाल्या. विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी याअनुषंगाने गीत गायन स्पर्धा वक्तृत्व स्पर्धेत भाग घेऊन सावित्री बाई फुले यांची वेशभूषा धारण करून उपस्थितांचे मन जिंकले .
यावेळी कार्यक्रमाचे संचालन देरकर मॅडम यांनी केले व आभार पोडे सर यांनी केले.या कार्यक्रमाला सर्व कर्मचारी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होते.