Wednesday, April 15, 2026
HomeBreaking Newsचाकू बाळगणाऱ्या "पवन" ला अटक......!

चाकू बाळगणाऱ्या “पवन” ला अटक……!

•शहरात धारदार शस्त्र वापरणाऱ्यांचा संख्येत वाढ.

अजय कंडेवार,वणी :-धारदार शस्त्र अवैधरित्या बाळगणा-या एका युवकाला वणी पोलिसांचा चमूने अटक केली आहे आरोपी कडून पथकाने धारदार शस्त्र (1 लाकडी मुठ असलेला चाकु) जप्त केली .

वणी येथील दीपक चौपाटी प्रेम नगर तेथील लोकासमोर एक इसम धारदार शस्त्र (1लाकडी मुठ असलेला चाकु) बाळगत चौकात माज माजवित असल्याची माहिती मिळाली होती. ही माहिती मिळताच पोलिस पथकाने  त्याठिकाणी जाऊन आरोपीला शिताफीने अटक केली. तो पोलीसांचे अटक चुकविण्याचा प्रयत्न करीत असल्याने सौम्य बळाचा वापर करून स्टाफच्या मदतीने त्यास ताब्यात घेतले.पोलिसांनी आरोपीकडून 1 धारदार चाकू व तसेच दुचाकी एम.एच -34 -बी.टी.-4699 अं.कि 40 हजार रु.असा एकुण 40 हजार 500/-रु मुदेमाल जप्त करण्यात आला.

या युवकावर कलम 4/25 शस्त्र कायद्याअंतर्गत वणी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची कार्यवाही (उप.वि.पो.अ.वणी) गणेश किन्द्रे यांचे मार्गर्शनात ठाणेदार P.I गोपाल उंबरकर यांचा आदेशावरून वणी पोलिसांनी केली.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page