Ajay Kandewar वणी:- वेस्टर्न कोल्ड फील्ड लिमिटेड नॉर्थ क्षेत्रातील राजूर – भांदेवाडा Under Ground Coal Mines मध्ये (ता.८ ) रोजी वणी विधानसभेचे आमदार संजय देरकर हे पाहणी केली असून प्रत्यक्ष 15000 फिट (Under Ground Coal Mines)खदानीत जाऊन पाहणी करीत वेकोली कर्मचाऱ्यांचा समस्या जाणून घेणारे संजय देरकर पहिले आमदार ठरलें.
भुमिखत कोळसा खाणीत अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते असून अनेक किलोमीटर आत जावून कोळशाचे उत्खन करावे लागते आहे. कोळसा उत्खनन करताना लहणातील लहान चूक देखील जीवावर बेतू शकतात असे कामगारांकडून सांगण्यात येतात. म्हणून या ठिकाणी जिम्मेदारी घेवून कामगारांना कोळसा उत्खनन करावे लागते आहे.वणी नॉर्थ क्षेत्रात भांदेवाडा व कुंभारखणी या दोन भूमिगत कोळसा खाणी असून यातील भांदेवाडा या खाणीत सुमारे ७५० च्या वर कामगार काम करीत आहे. या भूमिगत कोळसा उत्खनन करण्यासाठी वेकोली कामगारांना काय अडचणी निर्माण होतात व त्यांच्या पुढे कोणकोणती आवाहने निर्माण होतात याची प्रत्यक्ष जाणीव व पाहणी करण्यासाठी आमदार संजय देरकर हे स्वतः भूमिगत कोळसा खाणीत जाऊन पाहणी केली. भूमिगत कोळसा खान प्रत्यक्ष पाहणारे देरकर हे पहिले आमदार ठरलें .एक आमदार प्रथमतः कोळसा खाणीत जाणार असल्याने वेकोळी कडून चोख सुरक्षा देण्यात आली होती.यावेळी वेकोली कर्मचारी, अधिकारी व शिवसेनेचे काही नेते मंडळी उपस्थित होते.