Ajay Kandewar, वणी :- महाराष्ट्र राज्याचे अर्थ संकल्पीय अधिवेशन सुरू असून या अधिवेशनात विरोधकांकडून बीड जिल्ह्यातील बहुचर्चीत मसनजोग प्रकरण सरकारची कोंडी करीत आहे. त्यातच प्रशांत कोरटकर , कोकाटे यांचे प्रकरण विरोधकांनी ऐरणीवर घेतला आहे. राज्यात भाजप, शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी (अजित पवार) यांचे सरकार असून राज्यात घडत असलेल्या गुन्हेगारीतील प्रकरणात सत्तापक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते आरोपी म्हणून निदर्शनात येत असल्याने सत्तेतील लोकांनी राज्यात गुन्हेगारीचा उच्चांक मांडलेला असल्याचे आरोप होत आहे.
अश्यातच मुकुटबन पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या खडकडोह येथे शिवसेना शिंदे गटाच्या तालुकाध्यक्षाने चिचघाट येथील पोलिस पाटलाच्या डोक्यावर लोखंडी रॉडने हल्ला चढविल्याने पोलिस पाटील गंभीर जखमी झाल्याची घटना तारीख ३ रोजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली आहे.
झरि जामणी तालुक्यातील खडकडोह येथील रहिवासी असलेले शिवसेना (शिंदे गटाचे) तालुकाध्यक्ष मोरेश्वर सरोदे यांनी चिंचघाट येथील पोलिस पाटील पंढरी अरुण डुकरे यांचेवर शुल्लक कारणावरून वाद झाला व यावयाचे रूपांतर मारामारीत झाले व रागाच्या भरात येऊन मोरेश्वर सरोदे यांनी पोलिस पाटील पंढरी डुकरे यांचे डोक्यावर लोखंडी रॉडने जोरदार वार केला यात त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली असून त्यांचेवर वणी येथे उपचार चालू आहे. अविनाश अशोक डुकरे यांचे फिर्यादीवरून मुकुटबन पोलिस स्टेशनला बिएनएस अंतर्गत ११८(२), २९६, ३५१(२) नुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक दिलीप वडगावकर यांचे मार्गदर्शनानुसार जमादार दिलीप जाधव करीत आहे. या प्रकरणात पोलिस पाटील संघटना आक्रमक होण्याची शक्यता वाढली आहे.
🛑माऊंद्यायचे जेवण करायला जाणे पडले महागात….
नुकतीच शिवरात्र निमित्त खडकडोह व चिचघाट येथील काही भक्त मंडळी मध्यप्रदेशातील प्रसिद्ध शिवशंकराच्या दर्शनासाठी गेले असता, त्या लोकांनी माउंद्याचा कार्यक्रम खडकडोह येथील गणपती मंदिरात ठेवला होता. त्यानिमित्य पोलिस पाटील पंढरी डुकरे व त्यांचे काही सहकारी सायंकाळी जेवण करायला आले असता बस स्टॉप वरील पान टपरीवर कोल्ड्रिंक घेत असताना शिंदे गटाचे तालुकाक्ष मोरेश्वर सरोदे हे आले व त्यांनी अचानक वाद घालायला सुरवात केली यात झालेल्या वादातून लोखंडी रॉडने हल्ला झाल्याने हे जेवण डुकरे यांना चांगलेच महाग पडले आहे.