Saturday, June 6, 2026
Homeवणीखा.धानोरकर यांनी मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना दिला धिर..

खा.धानोरकर यांनी मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना दिला धिर..

•संजय खाडे यांनी केली आर्थिक मदत….

अजय कंडेवार,वणी :- रंगनाथस्वामी फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लि.वणी चे अध्यक्ष संजय खाडे यांच्याकडून वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या दोन कुटुबीयांना 20,000 हजार रू. ची आर्थिक मदत देण्यात आली तसेच खासदार बाळुभाऊ धानोरकर यांची मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना धीर देत सांत्वना दिली.

खासदार बाळुमार धानोरकर यांनी वणी तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात मृत पावलेल्या व्यक्ती अभय मोहन देउळकर रा. भुरकि (रांगणा) व रामदास जगन्नाथ पिदुरकर कोलेरा (पिंपरी) या दोन मृतकांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करून धिर दिला. त्यापुर्वी वणी रेस्ट हाउस येथे उपविभागीय अधिकारी तहसिलदार तसेच वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी यांचेसोबत चर्चा करून कायमस्वरूपी नरभक्षी वाघाचा बंदोबस्त करून मृतकाच्या कुटुंबियांना उर्वरित आर्थिक मदत तात्काळ देण्याच्या सुचना केल्या वणी तालुक्यात भविष्यात माणवावर हमला होवू नये याची दक्षता घ्यावी अशा सूचना संबंधित अधिका-यांना दिल्या.

तसेच रंगनाथस्वामी फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लि.वणी चे अध्यक्ष संजय खाडे यांचेकडून मृत व्यक्तीचे वारस मोहन आनंदराव देउळकर यांना 10,000 रूपये व प्रतिभा रामदस पिदुरकर यांना 10,000 रूपये असे 20,000 रूपये मा. खासदार बाळुभाऊ धानोरकर यांच्याहस्ते आर्थिक मदत करण्यात आली. त्यात शासकिय मदत प्रत्येक 10 लाख रू. त्यांना मिळाले आहे. उर्वरित 10 लाख रूपये सुध्दा तात्काळ आजच्या आजच दया अशी सुचना खासदार बाळुभाउ धानोरकर दिल्या तसेच परिसरात फिरत असलेले नरभक्षक वाघ आहे त्या वाघाचा कायमस्वरूपी बंदोबस्त करा असे उपविभागीय अधिकारी, तहसिलदार व वन विभागाच्या अधिका-यांना सुचना केल्या. तसेच परिसरातील शेतकरी व शेतमजूर यांनासुध्दा कुणीही घाबरून जाऊ नये असा घिर दिला व परिसरातील कोलेरा, पिंपरी, पिंपळगाव, उकणी व मुंगोलि या गावाच्या पुनर्वसनाबाबत लवकरात लवकर पुनर्वसण करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्यासोबत चर्चा करून शक्य तितक्या लवकर मिटींग लावून पुनर्वसानाचा मार्ग व इतरही समस्या मार्गी लावण्यासठी मिटींग घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांचेसोबत माझ्या उपस्थितीत मिटींग लावा अशा सुचना खासदार यांनी दिल्या..

याप्रसंगी उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे, तहसिलदार निखील धुळधर वणी, किरण जगताप उप वनसंरक्षक पांढरकवडा, आशिष वासनिक वनपरिक्षेत्र अधिकरी वणी, टिकाराम कांगरे अध्यक्ष जिल्हा मध्यवर्ती सह बँक, संजय खाडे अध्यक्ष रंगनाथस्वामी फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड वणी, प्रमोद वासेकर, संजय सपाट, जितेंद्र बोंडे प्रफुल उपरे, बंडु सोनटके, विलास चिकटे सरपंच नांदेपेरा अधिकारी व मोठया संख्येने गावकरी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page