•न्यायालयाने दिला पोलीस पाटलावर कारवाईचा आदेश.
नागेश रायपूरे, मारेगाव:– न्यायालयात खोटी साक्ष दिल्या प्रकरणी एका पोलीस पाटलास न्यायालयाने चक्क कारवाई चा आदेश दिल्याचा प्रकार मारेगाव न्यायालयात घडला. जागेश्वर विनायक चिंचोलकर रा.दांडगाव असे कारवाईचा आदेश दिलेल्या पोलीस पाटलाचे नाव आहे.
सदर घटना 6 आगस्ट 2020 रोजी मारेगाव पोलीस स्टेशन हद्दीत घडले.वनोजादेवी परिसरात पोलीस शिपाई अजय वाभीटकर हे गस्त घालत असतांना तालुक्यातील दांडगाव येथे अवैद्यरित्या एक इसम दारू विकत असल्याची गुप्त माहिती मिळाली.त्या माहितीच्या आधारे गावातील दोन प्रतिष्ठित पंचांना सुचना देवून घटनास्थळ गाठून उपस्थित पंचा समक्ष आरोपीच्या घराची झाडा झडती घेतली असता,180 मिली च्या देशी दारूच्या 11 बाटल मिळाल्या.या प्रकरणी आरोपी विरोधात गुन्हा क्र.187 /2020 नोंदवण्यात आला.व प्रकरण न्यायप्रविष्ट करण्यात आले.
या प्रकरणी न्यायालयात पंचाची साक्ष घेण्यात आली असता यावेळी पोलीस पाटील चिंचोलकर यांनी खोटी साक्ष दिल्याचे निदर्शनास आल्याने मारेगाव न्यायालयाचे न्यायाधीश निलेश वासाडे यांनी थेट दांडगाव चे पोलीस पाटील चिंचोलकर यांचेवर खोटी साक्ष दिल्या प्रकरणी कारवाईचा आदेश जारी केला आहे.