•ग्रंथ प्रदर्शनी व स्वस्त दरात पुस्तक विक्री स्टाॅलचे उद्घाटन.
अजय कंडेवार,वणी:- लोकवाड्ःमय गृह मुंबई तर्फे काॅ.गोविंद पानसरे अभिवादन विचारयात्रा विदर्भात साहीत्य संमेलनानिमीत्य आली आहे.त्याच अनुषंगाने ही विचार यात्रा वर्धा,गडचिरोली,चंद्रपुर मार्गे यवतमाळ जिल्ह्याच्या वणी शहरात आज दाखल झाली आहे.या विचारयात्रेचे शहरातील साहीत्यप्रेमींनी शिवतिर्थ स्मारक,टिळक चौक वणी येथे भव्य स्वागत केले.ही पुस्तक प्रदर्शनी वणी शहरात दि.12 व 13 फेब्रु.दोन दिवस राहून साहीत्यप्रेमी,पुस्तकप्रेमींना विचारांची मेजवानी देणार आहे.शहरातील व वणी विधानसभा मतदारसंघातील पुस्तकप्रेमींनी व कायॆकत्याॆेनी स्टाॅलला भेट देऊन पुस्तके खरेदी करावे असे आवाहन उद्घाटक पि.के.टोंगे ,अनिल घाटे सुनिल गेडाम यांनी केले आहे.
या निमित्त ग्रंथ प्रदशॆनी व स्वस्त दरात पुस्तक विक्री स्टॉलचे पि.के.टोंगे सरांचे हस्ते उद्घाटन झाले.याप्रसंगी मोहन हरडे,गजाजन कासावार,विलास शेरकी,कृष्णाची ढुमणे,अनिल घाटे,सुनिल गेडाम उपस्थित होते.संचालन सुनिल गेडाम यांनी तर आभार अनिल घाटे यांनी केले. तसेच यावेळी बहुसंख्येने पुस्तकप्रेमीही उपस्थित होते.