Saturday, April 26, 2025
HomeBreaking Newsकिरण ताईंचा १५ ते २० गावांमध्ये थेट नागरिकांशी संवाद.....

किरण ताईंचा १५ ते २० गावांमध्ये थेट नागरिकांशी संवाद…..

•वहिनींच्या प्रचाराने महिलांमध्ये उत्साह. •दररोज २५ ते ३० कॉर्नर सभा व वैयक्तिक भेटी.

Ajay Kandewar,Wani:- वणी मतदारसंघातील महाविकास उमदेवार संजय देरकर यांच्यासोबत संपूर्ण मतदारसंघात त्यांच्या सहचारिणी किरणताई देरकर यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. किरण वहिनी यांच्या प्रचारामुळे वणी मारेगाव व झरी तालुक्यातील महिलांमध्ये उत्साह संचारला आहे. निवडणुकीतील प्रचारासाठी संजय देरकर यांचे कुटुंबीय थेट नागरिकांशी संवाद साधत असून त्यांना जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून संजय देरकर हे वणी विधानसभा मतदारसंघाचे महिलांचे प्रतिनिधीत्व करत आहेत. रुग्णसेवेपासून समाजकार्यास सुरूवात करून त्यांनी सामाजिक प्रवास सुरू केला. महिलांना न्याय मिळवून देण्याचा कार्यात किरण वहिनी या प्रारंभीपासूनच सहभागी आहेत. याशिवाय मतदारसंघातील सामाजिक, सांस्कृतिक कार्यात त्या सक्रिय असतात. हळदी कुंकू,होम मिनीस्टर, मकरसंक्रात, महिलांसाठी आरोग्य शिबीर असे कार्यक्रम त्या नियमित घेत असतात. किरण वहिनी प्रचारासाठी मुलं यांच्याशी वैयक्तिक संवाद साधण्यावर त्या भर देत आहेत.हिरीरीने घराबाहेर पडतात. यावेळी त्या गेल्या 2 महिण्यापासून वणी, मारेगाव व झरी तालुक्यात गावोगावी फिरत आहेत. सकाळी ५ वाजता त्यांची दिनचर्या सुरू होते. घरातील सर्व कामे आटोपून सकाळी ८ वाजता त्या प्रचारासाठी आपली टीम घेवून घराबाहेर पडतात. ग्रामीण भागात प्रचार फेरी, प्रत्येक घरी भेट, संवाद असा त्यांचा दिवसभराचा कार्यक्रम असतो. सायंकाळी शहरातील मतदारांच्या वैयक्तिक भेटी, कॉर्नर सभा त्या घेत आहेत. दररोज १५ ते २० गावांमध्ये कॉर्नर सभा, वैयक्तिक भेटी घेत फिरत आहेत.

‘ किरण वहिनी’ म्हणून त्या मतदारसंघात परिचित आहेत.मतदारसंघातील महिला, तरूणी लहान याशिवाय महिला चमुंचा माध्यमातून गावोगावी तरूणांशी संवाद साधून प्रचार करत आहे. युवाशक्ती संवाद सभा घेवून तरूण कार्यकर्त्यांचे संघटन या निमित्ताने ते मजबूत करत आहे.नागरिकांचे प्रेम, सहकार्य व आशीर्वादाच्या बळावर वणी मतदारसंघात एकदा संजय देरकर यांच्या माध्यमातून विकासपर्वाचा विजय होईल, असा विश्वास देरकर कुटुंबियांतील सदस्यांनी व्यक्त केला.

 

 

 

 

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments