अजय कंडेवार,वणी:- कोरोना काळात अभिवचन रजेवर बाहेर पडतच पसार झालेल्या आरोपीला यवतमाळ गुन्हे शाखेने अटक केली.दिपक यशवंत पुणेकर (रा.छोरीया लेआउट , गणेशपुर),वणी असे अटक करण्यात आलेल्या बंदी कैद्याचे नाव आहे.
हा दिपक सराईत गुन्हेगारांपैकी एक गुन्हेगार होता. याला न्यायालयाकडून शिक्षा सुनावण्यात आली. दिपक पुणेकर हा नागपूर मध्यवर्ती कारागृह बंदी असताना रजेवर बाहेर पडला मात्र कालावधी संपूनही हजर न झाल्याने त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मागील काही दिवसाअगोदर नागपुर मध्यवर्ती कारागृहाकडुन कारोना आकस्मीक अभिवचन रजेवरुन फरार असलेल्या बंदयाची माहिती एलसीबीला मिळाली. या पथकाने वणी उपविभागात शोध घेत असतांना नागपुर मध्यवर्ती कारागृहातुन कारोना आकस्मीक अभिवचन रजेवरुन फरार असलेला दिपक यशवंत पुणेकर (रा. छोरीया लेआउट) ,गणेशपुर वणी याच परिसरातील असल्याने त्याबाबत माहिती घेतली असता त्याचाविरुध्द पो.स्टे. राजुरा जि. चंद्रपुर येथे भा.द.वि कलम २२४ प्रमाणे गुन्हा होता. नागपुर मध्यवर्ती कारागृहातुन कारोना आकस्मीक अभिवचन रजेवरुन फरार असल्याचे नागपुर कारागृहाकडुन माहितीनुसार त्या फरार बंदयाचा शोध घेतला असता, तो त्याचा राहत्या घरी मिळुन आल्याने त्यास पुढील कारवाई पो.स्टे. राजुरा जि. चंद्रपुर यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई ही वरिष्ठ अधिकारी यांचे मार्गदर्शनात स.पो.नि अमोल मुडे, पो.उप.नि योगेश रंधे, पोहवा योगेश डगवार, सुनिल खंडागळे, पो.ना सुधिर पांडे, सुधिर पिदुरकर, निलेश निमकर, पो.कॉ रजनिकांत मडावी, सतिश फुके सर्व स्था.गु.शा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.