अजय कंडेवार,वणी:- तालुक्यांतील कायर गावा जवळील “विदर्भा नदीपात्रात ” यावर्षी झालेल्या जोरदार पावसामुळे या नदीपात्रात दर्जेदार वाळूचा संचय झाला आहे. या दर्जेदार वाळूवर रेती तस्करांची वक्रदृष्टी पडली आहे.पूस नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाळूचा अवैध उपसा सुरू आहे. या वाळूची बेकायदेशीरपणे त्या वाहतूक केली जात आहे. मात्र त्यावर प्रशासनातर्फे कोणतीच कारवाई होताना दिसत नाही. विशेष म्हणजे दिवसाढवळ्या वाळू उपसा होत आहे. हीच अवैध वाळू मोठ्या वाहनांनी वाहून नेली जात आहे. मात्र या वाहतुकीला लगाम घालण्यात महसूल विभागाला अपयश आले आहे. त्यामुळे रेती तस्करांनी वाळूचा उपसा करण्यासाठी अक्षरश: रात्री धुमाकूळ घालण्यास तस्कर सज्ज झाल्याची चर्चा गावात सूरू आहे.
वाळू उपसाला लगाम लावण्याची गरज आहे. रेती तस्कर शासनाचा महसूलसुद्धा बुडवित आहे. त्यामुळे शासनाची रॉयल्टी बुडत आहे.रेती टंचाईमुळे रेतीचे सोन्यासारखे भाव वाढल्याने चोरटे सक्रिय झाले आहे.. आता यावर “विदर्भ न्यूज “मालिका चालवून आवर घालणार यात आता शंका नाहीं… रात्री रेती चोरटे सक्रिय झाल्याची माहिती पोलिस प्रशासनाला झाली आहे आता कार्रवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विदर्भ न्यूज याचा पाठलाग ही करणार आहे आणि वेळोवेळी प्रशासनाला अडकित्यात घेतल्या शिवाय राहणार नाही हे त्रिकालाबाधित सत्य….