अजय कंडेवार,Wani:- तालुक्यातील राजूर गावात एन्ट्री करताच मुख्यचौकात आणि विविध ठिकाणी वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या निधीतुन जवळपास 2021-22 ला गावात एकूण 3 हायमास्ट लॅम्प (पथदिवे) बसविण्यात आले.हे पथदिवे बऱ्याच महिन्यांपासून “अर्धे दिवे बंद आणि अर्धे सूरू” अश्या अवस्थेत पडुन असल्यामुळे ते आता “शो – पीस” बनले आहे .तसेच जीवघेणा रोहित्र उघडे असून एखादी अनुचित घटना घडणार असल्याचे चित्र ही मुख्य चौकात निर्माण झाली आहे यात आता काहींच शंकाच उरली नाही.
राजूर येथील इजारा चौक, विहार चौक व मुख्य चौक येथे तीन ठिकाणी आमदार यांचा नीधीतुन पथदिवे बसविण्यात आलेले हायमास्ट लॅम्प गेल्या काहीं महिण्यापासुन अर्धे दिवे बंद आणि अर्धे सूरू अश्या अवस्थेत असल्यामुळे मुख्य चौकच आता अंधारात असल्यामुळे हायमास्ट लॅम्प “शो-पीस” ठरत आहे. ऐन सणासुदीच्या काळात गावात बाहेरील पाहुणे मंडळी येत असतात ज्यावेळी गावात एन्ट्री करतात तेव्हाच भर अंधार जेंव्हा दिसतो तेव्हा गावाला गालबोट लागत असल्याचेही चित्र दिसत आहे. पण कोमात असलेले सचिव माञ जागे होण्यास तयार नाहीं. तसेच मुख्य चौकातील हायमास्ट चे रोहित्र जीवघेणे बनले आहे.या उघड्या रोहित्रांबाबत वीज कंपनीकडे विचारणा केली असता ते ठेकेदाराकडे बोट दाखवून मोकळे होतात. ठेकेदार हे ना ते कारण पुढे करून वेळ मारून नेतात अन् रोहित्रानजीकचे रहिवाशांना मात्र ‘भीती’ (डेंजर) च्या सावटाखाली वावरणे भाग पडते.
ग्रामस्थांमध्ये हायमास्ट दिवे बंद अवस्थेत असल्याने एक ते दोन वर्षापुर्वी लोकप्रतिनीधीच्या नीधीतुन बसविण्यात आले असता हायमास्ट लॅम्प देखभाल दुरुस्तीची जबाबदारी ही एक वर्षासाठी संबधीत ठेकेदार यांची असते व नंतर ग्रामपंचायतच्या माध्यमातून देखभाल व दुरुस्ती करावी लागत असते. मात्र असे असतांना याकडे येथून जवळच असलेल्या प ग्रामपंचायत हद्दीतील इलेक्ट्रिक खांब तसेच हायमास्ट लँप वरील पथदिवे हे गेल्या काहीं महिन्यापासून अर्धे बंद आहेत.यामुळे गावात रात्रीच्या वेळी मुख्य चौकच अंधार राहत असून रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्यांना खूप त्रास होत आहे. आता याकडे ग्रामपंचायत सचिवाने जातीने लक्ष देण्याची गरज आहे . गावातील समस्या वाऱ्यावर न सोडता त्याला पूर्णत्वास नेणे महत्वाचे असते.”कर्तव्य कळेना अन् तुतारी मारल्याशिवाय राहेना… अशी गाव प्रशासनाची स्थिती आहे.
“सद्यस्थितीत हा चौक गावचा मध्य भाग आहे. येथे नेहमी लोकांची व वाहनांची मोठी गर्दी असते. चौकातील हायमास्ट बंद असून ती तत्काळ दुरूस्त करावीत.”- राजूर, ग्रामस्थ.