Friday, June 12, 2026
Homeवणीकायर गावात काही पॅनल प्रमूख शोधताहेत खर्च करणारा ठेकेदार.....?

कायर गावात काही पॅनल प्रमूख शोधताहेत खर्च करणारा ठेकेदार…..?

•जो खुद के घर का ही नहीं…. वो जनता का कैसे? अशी ही एक चर्चा….

•गावचा विकास कोण करणार? दुसऱ्यांचा भरवश्यावर राहणारा? ,की स्वबळावर जनतेला आधार देणारा….

अजय कंडेवार,वणी:- गावाचं सरपंचपदावर विराजमान होण्याची इच्छा मनी असलेल्या अनेकांनी आपापल्या गावात मोर्चेबांधणी सुरू केली होती. मात्र या आनंदावर राज्य सरकारचनी ग्रामपंचायतीची निवडणूक आरक्षणही जाहिर केले. त्यामुळे आता गावातील पॅनलचा खर्च कुणी करायचा असा प्रश्न गावपुढारी व पॅनल प्रमुखावर आले आहे. (Gram Panchayat election Panal)

गावात सरपंचपदावर डोळा ठेवून पॅनल प्रमुखांकडून किंवा सरपंचपदासाठी इच्छुकानी सदस्यांना  निवडणूक रिंगणात उतरवले आहे. स्वतःबरोबर या उमेदवाराचा खर्च संबंधित पॅनल प्रमुख उचलत असताना
काहीं पॅनल प्रमूख वणीत येऊन वेग वेगळ्या पुढार्यांकडे खर्चाची मदतीचा हात मागत असल्याचे चित्र दिसून येत आहे.अशी खमंग चर्चा होत आहे.  विशेष गावात असेही बोलल्या जात आहे की ,शर्यती देखील सूरु झाले आहे. गाव विकास गेला पाण्यात किसमे कितना है दम .…. अशीच निवडणूक गावात दिसून येत आहे तेही पक्षाचा भरवश्यावर पॅनल प्रमूख उड्या मारीत असल्याचे दिसून येत आहे. परंतू ही निवडणूक स्वबलावर असणारी गाव निवडणूक आहे. परंतु यातही काहीं पॅनल प्रमूख दारो दारी भटकंती करीत असल्याची गाव चर्चा आहे.
आता यांचे भविष्य मतदार राजाचा हाती आहे.चला पाहूया समोर….. कोण जनतेसाठी काम करू शकतो त्यालाच मते मतदार राजा देईल यात काही शंका नाहीच.

परंतू ऐन निवडणुकीच्यावेळी गावात काहींनी पक्षच बदलले आहे. यावरून त्यांची काय लायकी हेही मतदार राजाला कळले आहे.यांचा अर्थ असा ही बोलल्या जात आहे की, खुद का विकास करण्यासाठीही काही गाव पुढारी इच्छा दर्शवित आहे.आणखी काहीच असेही म्हणणे आहे की,जो खुद के घर का ही नहीं…. वो जनता का कैसे? अशी गावात खमंग चर्चा सुरू झाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page