Wani : तालुक्यातील कायर गावातील लेक कोमल अनिल चौधरी नांदेड पोलीस सेवेत नुकतीच रुजू झालेल्या यांच्या आई-वडिलांना १५ ऑगस्ट २०२६ रोजी कायर ग्रामपंचायतीत स्वातंत्र्यदिनाच्या ध्वजारोहणाचा मान देण्यात आला. गावासाठी अभिमानाची बाब ठरलेल्या चौधरी कुटुंबाच्या कर्तृत्वाची दखल घेत सरपंच नागेश घनकसार यांनी पुढाकार घेऊन हा विशेष सन्मान मिळवून दिला.
या प्रसंगी सरपंच नागेश घनकसार यांच्या हस्ते कोमल चौधरी यांच्या आई-वडिलांचा सत्कार करून सन्मानपूर्वक गौरव करण्यात आला. मुलगी पोलीस सेवेत दाखल झाल्याचा अभिमान आणि तिच्या कर्तृत्वाचा गौरव म्हणून ग्रामपंचायतीने आई-वडिलांना दिलेला हा सन्मान कौतुकास्पद ठरला. गावातील कर्तृत्ववान कुटुंबांचा सन्मान करण्याची सकारात्मक परंपरा कायर ग्रामपंचायतीने या उपक्रमातून अधोरेखित केली.

