Wani:- सध्या एका फोकनाळ्या स्वयंघोषित “इतिहासकाराची” चर्चा चांगलीच रंगली आहे. इतिहासाचा अभ्यास किती आहे, हे माहीत नाही; पण मोठमोठ्या नेत्यांची पाय चाटून चापलुसी करून पोमांडेंगी भाषणांचा गाजावाजा करीत स्वतःची प्रतिमा उभी करण्याचा त्यांचा प्रयत्न मात्र सर्वांनाच दिसत आहे.
मोठमोठे शब्द, उंच उंच दावे, चपळुसी करून मिळविलेल्या थातूरमातूर पदाचा भीकमंग्या रुबाब आणि स्वतःलाच सर्वज्ञ समजण्याची सवय यामुळे ते कायम चर्चेत असतात. कामापेक्षा गाजावाजा आणि वास्तवापेक्षा स्वतःची स्तुती करण्यातच त्यांचा अधिक वेळ जात असल्याची उपरोधिक चर्चा रंगली आहे.गावोगावी फिरून मोठ्या गप्पा मारायच्या, पण जबाबदारीची वेळ आली की हात झटकायचे, अशीही कुजबुज सुरू आहे. उधारी करून वेळेवर परतफेड न करणे हीदेखील त्यांच्या नावाशी जोडली जाणारी चर्चा बनली आहे. त्यामुळे “हा जिथे जातो तिथे काही ना काही “भो***” पाडून ठेवूनच जातो,” अशी टोलेबाजीही ऐकायला मिळत आहे.
दरम्यान, मोठे पद मिळाल्यानंतर समाजकारणापेक्षा प्रमुखगिरी आणि चंपूगिरीतच अधिक रस असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे “इतिहास घडवण्यापेक्षा स्वतःचीच उधारीची ठग कथा रंगवण्यात व्यस्त असलेला हा स्वयंघोषित इतिहासकार नेमके कोणते पान लिहित आहे की नेत्यांची पाय चाटून आपला एक्का जमवत आहे ?” असा ही हसून प्रश्न नागरिक विचारत आहेत.

