महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख मा.श्री.उध्दव साहेब ठाकरे आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा……..!

शुभेच्छुक:-संजय नि. देरकर आमदार वणी विधानसभा (संपर्क प्रमुख चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्र)
शुभेच्छुक:- सौ.किरणताई सं.देरकर (अध्यक्ष, एकवीरा महिला बैंक,मारेगाव)
उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वणी विधानसभा क्षेत्रात विविध कार्यक्रमाची रेलचेल….
शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस वणी विधानसभा क्षेत्रात विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात येणार आहे. २७ जुलैला सकाळी ७ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भव्य मॅरॉथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेकरिता आकर्षक बक्षिसेही ठेवण्यात आली आहे. सकाळी ९.३० वाजता उद्धवजी ठाकरे यांच्या दीर्घायुष्यासाठी जगन्नाथ महाराज देवस्थानात महापूजा करण्यात येणार आहे. दुपारी १२ वाजता ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटप करण्यात येणार आहे. तसेच सकाळी १० ते ३ वाजेपर्यंत वणी वरोरा रोड वरील शिवसेना जनसंपर्क कार्यालय येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे..

