Sunday, May 3, 2026
HomeBreaking News"मॅट " ने "विकास व शुभम" ला दिली क्लीन चिट.........

“मॅट ” ने “विकास व शुभम” ला दिली क्लीन चिट………

• वणी पोलीस ठाण्यात दोघांची "रि-एन्ट्री "

Ajay kandewar, Wani:-मागील काही महिन्यांपूर्वी वणी पोलीस स्टेशनमधील डी.बी.पथकाचे हेड कॉन्स्टेबल विकास घडसे, शुभम सोनुले व सागर सिडाम यांची ता.8 फेब्रुवारी रोजी उचलबांगडी करीत बदली करण्यात आले.

कर्तव्यात कसूरी म्हणून 8 फेब्रुवारी शनिवार रोजी डी बी पथकातील 3 पोलिस कर्मचाऱ्यांची तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली. हेड कॉन्स्टेबल विकास घडसे, शुभम सोनुले, सागर सिडाम असे बदली करण्यात आलेले पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव आहे.वणी पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंदे व गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी पोलीस ठाण्यात वेगळे डिबी पथक (गुन्हा शोध शाखा) तयार करण्यात आले होते. या अवैध धंद्यांना पाठबळ देण्याच्या आरोपावरुन या तिन्ही पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी केली जात होती.शेवटी 9 फेब्रु रोजी “त्या तीन पोलीस कर्मचाऱ्यांचा” बदलीचे आदेश वणी ठाण्यात धडकले. त्या तिन्ही पोलीसांवर अन्याय झाल्याचे लक्षात येताच महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरण (मॅट) नागपूर येथे अन्यायाविरोधात याचिका दाखल करण्यात आला.या सर्व बाबींची वस्तुस्थिती लक्षात घेता, न्यायाधिकरणाने प्राधिकरणाला अर्जदाराला “पुन्हा पदावर रुजू करून घेण्याचे निर्देश” संबंधित प्राधिकरणाचे (एस.पी.यवतमाळ) यांना देण्यात आले.त्यावरून ता. 23 जुलै रोजी हेड कोन्स्टेबल विकास धडसे, पोलीस शिपाई शुभम सोनुले यांची 5 महिन्यांचा दीर्घकाळानंतर वणी ठाण्यात “री- एन्ट्री ” करताच पोलीस वर्तुळात जोमात चर्चा सुरु झाली.शेवटी कामात चातूर्य असणाऱ्या विकास धडसे तसेच क्लिष्ट कामें सोयीस्कर हाताळण्यात नेहमी अग्रेसर असणारा शुभम सोनुले वापस आल्याने ठाण्यात आनंदाचे वातावरण आहे. हे दोघेही क्लीन बोल नाही कारण टाकण्यात आलेला बॉलच no बॉल होता असे थर्ड अंपायरनी निर्णय दिला अशीही जोरदार पोलीस वर्तुळात चर्चा आहे. परंतु येता काळ “या दोघांचा” कस जाईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page