•पत्रकार परिषदेतून घणाघाती आरोप, गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी
सुरेंद्र इखारे,वणी :-चर्च बांधकामच्या नावावर अनुयायांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या इंडीयन फ्रेंड्स फेलोशिपचा पास्टर वर फसवणूकीचे गुन्हे दाखल करून अटक करण्याची मागणी अरविंद तुराणकर, सुनिल सुसनकर व वामन नागपुरे यांनी दिनांक 21 तारखेला विश्राम गृह येथे एका पत्रकार परिषदेतून घणाघाती आरोप केले आहे..

सविस्तर असे की, वणी शहरात इंडीयन फ्रेन्डस फेलोशीप (चर्च) कार्यरत असुन या चर्च चे विजय स्वामीदास आर्नकोंडा हे पास्टर आहे. तर ह्या चर्च मध्ये अनेक अनुयायी असुन विश्वासी सदस्य आहे. यापैकी विश्वासी सदस्य म्हणून अरविंद तुराणकर रा.नायगाव, सुनिल सुसनकर एकता नगर वणी,वामन नागपुरे हे असुन या तिघांनी धर्माचा बाबतिस्मा येऊन भगवान येशु चे अनुयायी बनले आहेत. मात्र या तिघांनी येथिल शासकीय विश्रामगृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत असा आरोप केला आहे की, वणी येथे इंडियन फ्रेन्डस फेलोशीप या संस्थेचे स्वता:च्या मालकीचे चर्च नाही. त्यामुळे पास्टर विजय आर्नकोंडा यांनी सर्व अनुयाया समोर वणी येथे आपल्या हक्काचे चर्च बांधायचे आहे व त्याकरीता प्लॉटची आवश्यता आहे व त्यानंतर ह्यावर भव्य असे चर्च उभारायचे आहे असे म्हणु या तिघांसह इतर शेकडो अनुयायांन कडुन करोडो रूपयाचा निधी गोळा केला आहे. परंतु हया निधीची पावती कोणालाही देण्यात आली नाही.

त्यानंतर यांनी अधिक चौकशी केली असता या तिघांच्या असे निदर्शनास आले की, पास्टर ने गोळा केलेल्या निधीतुन जे काही प्लॉट्स विकत घेतले ते चर्चच्या नावाने न घेता स्वता:च्या नावाने विकत घेतले आहे. त्यातील पहीले जे २ प्लॉट विकत घेतले ते लेडांगे यांच्या ट्रान्सपोर्ट दुकाना समोर नांदेपेरा चौफुली येथे व दुसरे २ प्लॉट निमजे ले-आऊट नांदेपेरा रोड येथे तर टाटा नेक्सा हि ११ लाखाची चार चाकी गाडी सुध्दा त्यांनी आपल्या स्वतःच्या नावाने विकत घेतली आहे.पहीले विकत घेतलेल्या दोन प्लाट वर टिनाचे सेड टाकून तेथे प्रार्थना घेतल्या जात आहे. परंतु हि संस्था धर्मदाय आयुक्ताकडून रजिष्ट्रर केल्या गेलेली नसुन अनाधिकृत आहे . हे जेव्हा आम्हाला लक्षात आले तेव्हा आम्ही पास्टर कडे चर्च कमेटी बनविण्या करीता आग्रह धरला असता काही दिवस ठीक आहे बनवु, असे म्हणून वेळ मारून नेली. परंतु -आज पर्यंत रितसर चर्च कमेटी रजिस्टर केल्या गेलेली नाही. व प्रभु यशुच्या नावाने लोकांनी दिलेले दान संस्थेच्या नावाने बँक खाते काढुन त्यात जमा करण्या ऐवजी पास्टर हे स्वता:च्याच नावने जमा करीत आहे.

हे कार्य प्रभु येशुच्या सेवेच्या नावावर व ख्रिश्चन धर्माच्या धर्मांतरा करीता वापरण्याच्या नावावर स्वताची खाजगी संपत्ती वाढविण्याकरीता केल्या जात असल्याचा आरोप तक्रारीतुन केला असून घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत याची माहिती दिली. तसेच हया गैरव्यवहारा बाबत तक्रार दारांनी चर्चच्या पैशाचा आपण गैरवावर करून आर्थिक घोटाळा करीत आहात अशी विचारण केली असता पास्टर हे आम्हाला व आमच्या कुटुंबीयांना चर्च मधुर हात धरून बाहेर काढु, तुम्हाला गुंडाकरवी कोठेही जिवानीशी संपवुन टाकु असे प्रत्याक्ष व फोनवर धमकावीत असल्याचाही आरोप केला आहे.

विशेष म्हणजे सदर चर्च च्या पास्टर ला कोणतीही नौकरी नसतांना त्यांचा कोणताही व्यवसाय नसतांना किंवा उत्पादनाचे कोणतेही साधन त्यांच्या जवळ नसतांना त्यांनी करोडोची संपत्ती कशी काय जमविली? हयाची चौकशी होणे गरजेचे आहे. प्रभु येशुच्या नावाने अनुयायांची आर्थिक फसवणूक करत जमा केलेल्या पैशाचा गैरवापर केल्याबद्दल पास्टर वर फौजदारी गुन्हे दाखल करून अटक करण्यात यावी अशा आशयाची तक्रार अरविंद तुराणकर, सुनिल सुसनकर व वामन नागपुरे यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक यवतमाळ,उपविभागीय पोलिस अधिकारी वणी, धर्मदाय आयुक्त, यवतमाळ, पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन वणी यांच्याकडे केली असून या बाबतची माहिती पत्रकार परिषदेतून देण्यात आली आहे.


