Ajay Kandewar,Wani:- खा. संजय देशमुख व खा. प्रतिभाताई धानोरकर यांच्या मार्गदर्शनात संजय देरकर यांचा प्रचार सुरु आहे. उद्धव ठाकरे यांची सभा जाहीर होताच शहरासह, ग्रामीण भागातील सर्व शिवसैनिकांमध्ये व काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. झरी तालुक्यात वामनराव कासावार यांच्या मार्गदर्शनात काँग्रेसच्या नेत्यांनी प्रचाराची धुरा सांभाळली आहे. मारेगाव तालुक्यात शिवसेनेसह काँग्रेसचे कार्यकर्ते संजय देरकर यांच्या प्रचारार्थ कामाला लागले आहेत.
महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते हे उबाठा गटाचे अधिकृत वणी विधानसभेचे उमेदवार संजय नि.देरकर यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. देरकर हे आमदार झाले पाहिजे अशी येथील विधानसभेतील नागरिक, पदाधिकारी आणि सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे असे देखील अनेक पदाधिकारी यावेळी म्हणाले .यासाठी वणी मतदार संघात मोर्चेबांधणी ही केली आहे.