Ajay Wani:- विविध समस्या जाणून घेण्यासाठी विधानसभा आमदार तथा शिवसेना (विदर्भ) नेते बच्चूभाऊ कडू यांचा ८ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता बोरगाव (अहेरी) येथे पाहणी दौरा आयोजित करण्यात आला आहे.
या दौऱ्यात वेकोली प्रकल्पबाधित शेतकऱ्यांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेतल्या जाणार आहेत. यामध्ये भूसंपादन, योग्य मोबदला, स्थानिकांना रोजगार, प्रदूषणावर उपाययोजना तसेच पुनर्वसन आदी महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा होणार आहे.या बैठकीला परिसरातील प्रकल्पबाधित शेतकरी, कामगार तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसेना वणी उपतालुकाप्रमुख धीरज राजुरकर व अनिल उलमाले यांनी केले आहे.

