•भव्य सत्कार समारंभ संपन्न.
• जिल्ह्यातील अविस्मरणीय कार्यक्रम पॅरामाऊंट शाळेत
अजय कंडेवार,चंद्रपूर :- शहरीकरण आणि लघु कुटुंबपद्धतीच्या आजच्या पिढीत आजी-आजोबा हे नाते दुरावले आहे. मात्र, हे दुरावलेले नाते घट्ट करण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील बाबुपेठ येथील पॅरामाऊंट कॉन्व्हेन्ट तर्फे शनिवारी दिनांक 20 मे.रोजी आजी-आजोबांचा भव्य सत्कार घेण्यात आले. यावेळी आजी-आजोबांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवून कार्यक्रमाची रंगत आणखीनच वाढविली. चंद्रपूर जिल्ह्यातील अविस्मरणीय असा कार्यक्रम पॅरामाऊंट शाळेतच घेण्यात आला.Grandparents enjoyed their grandchildren’s school.Grand felicitation ceremony held. Unforgettable events in the district at Paramount School.
शाळेतले विश्व बहुतांशी आई-बाबा, शिक्षक, विद्यार्थी यांच्याभोवतीच फिरत असते. आजी-आजोबांचा नातवंडांच्या शाळेशी तसा संबंध येत नाही. पण शनिवारी पॅरामाऊंट कॉन्व्हेन्ट मध्ये आजी-आजोबांना खास आमंत्रित करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उपस्थित मान्यवरांचा हस्ते आजी-आजोबांचा सत्कार करण्यात आले हे विशेष….. आजी-आजोबांचा भरगच्च अशी गर्दीही होती.आजी-आजोबांनी वेगवेगळ्या गाण्याचा आस्वाद घेत अभूतपूर्व नृत्यही केले . जणू काही नातवंडांच्या शाळेत वयातील विसावं दशकच आठवले यात काही शंका नाहीच यातूनच दिसले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे संस्थाचालक पी. एस. आंबटकर होतें तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून महाविकास अघाड़ी (Mahavikas Aghadi) विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ आमदार (Vidarbha Madhyamik Shikshak Sagh) सुधाकर अडबाले हे होते. विशेष उपस्थिती म्हणुन उपसंस्थाचालक पियूष आंबटकर, अंकीता आंबटकर (डायरेक्टर),प्रांजली रघटाते (मेंबर), डॉ. पायल आंबटकर (डायरेक्टर) , शाळेचे मुख्यद्यापक फय्याज शेख व राजदा मॅम हे उपस्थित होते.