अजय कंडेवार,वणी:- महाशिवरात्री निमित्य विविध ठिकाणी शिव मंदिर असल्याने भक्तांची मोठी मांदियाळी असते. दिनांक 8 ला चंद्रपुर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यात येणाऱ्या भटाळा येथे महाशिवरात्री निमित्य मोठे प्रमाणात शिवभक्त जात असतात. अश्यातच शहरातील काही युवक महाशिवरात्रीचा सणासुदीसाठी मदिराचे दर्शन आटोपून वणीच्या दिशेने येतांना वर्धा नदीवर थांबा घेत आंघोळी करीता गेलेल्या काही नदीतील पाणी बघून त्यांना पोहता येत नसतांनाही पोहण्याचा मोह झाला व तो मोह त्यांच्या जीवावर बेतला. त्या युवकांपैकी 3 युवकांचा पाण्यात बुडल्याची दुर्दैवी घटना दि.8 मार्च रोजी सायंकाळी घडली.विशेष हे तिन्ही युवक शहरातील विठ्ठलवाडी येथील असल्याची विश्वसनीय माहिती समोर येत आहे.ही बातमी शहरात वाऱ्यावर सारखी पसरली असता दरम्यान, शुक्रवार सायंकाळी या घटनेची माहिती मिळताच वणी पोलिस ठाणेदार अनिल बेहरानी चमूसहीत घटनास्थळी व माजरी पोलिसांचा ताफा ही दाखल झाले. हे तीनही यूवक वणीतील असल्याचे सांगितले जात होते.अंधार झाल्याने त्यांचा जराही थंगपत्ता लागलेला नाही.याबाबत शनिवारी सकाळीच NDRF पथक येऊन शोधकार्य सुरू केले जाईल असेही पोलिसांकडून सांगण्यात आले.वृत्त लिहे पर्यंत त्यांचा कुठलाही ठावठिकाना लागला नाही.
एकाच घरातील दोघे भाऊ…..
वणीतील विठ्ठलवाडी परिसरातील तिघेही असुन एका कुटुंबातील दोन भाऊ नदीत बुडल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान महाशिवरात्रीच्या दिवशी त्या दोन्ही कुटुंबियांवर काळाचा घाला झाल्याने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.