Tuesday, February 17, 2026
HomeUncategorizedअवैध देशी दारू तस्करीवर LCB चा रट्टा.....

अवैध देशी दारू तस्करीवर LCB चा रट्टा…..

•वाहनासह ₹३,४३,८४० किमतीचा मुद्देमाल जप्त,इसम अटकेत.

Ajay Kandewar,Wani:- वणी परिसरात अवैध दारू वाहतुकीवर अंकुश लावण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळने बुधवार, ०९ डिसेंबर रोजी महत्त्वपूर्ण कारवाई करत एक इसमाला रंगेहाथ पकडले. तस्करीसाठी वापरली जाणारी चारचाकी तसेच मोठ्या प्रमाणात देशी दारू असा एकूण ₹३,४३,८४० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पथक वणी हद्दीत गुन्हेगार तपासणी आणि अवैध धंद्यांवर लक्ष ठेवून पेट्रोलिंग करीत असताना पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार मारुती सुझुकी कार (MH-31-BC-1777) नांदेपेरा रोडमार्गे अवैध देशी दारू घेऊन जाणार असल्याचे समजले. माहितीची खातरजमा करून पथकाने तत्काळ त्या दिशेने रवाना होत वाहनाला थांबवून तपासणी केली.वाहन चालकास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने आपले नाव मोहम्मद इरफान मोहम्मद सिद्दीकी (वय ३७, रा. भिमनगर, वणी) असल्याचे सांगितले. तपासणीत वाहनातून ९० एमएल व १८० एमएल क्षमतेच्या एकूण १,०४८ देशी दारूच्या बाटल्या आढळून आल्या. जप्त केलेल्या दारूची किंमत ₹४३,८४० असून तस्करीसाठी वापरलेली कार धरून एकूण मुद्देमालाची किंमत ₹३.४३ लाख इतकी आहे.

या इसमावर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवून त्यास आणि मुद्देमालास पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी पोलीस स्टेशन वणी यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस स्टेशन वणीचे अविनाश चिकराम करीत आहेत.ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिता, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतिश चवरे (स्थानीय गुन्हे शाखा, यवतमाळ) यांच्या देखरेखीखाली सपोनि दत्ता पेंडकर, सुनिल खंडागळे, सुधिर पांडे, निलेश निमकर, सुधिर पिदुरकर, सलमान शेख, रजनिकांत मडावी आणि सतिश फुके यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments