Thursday, March 5, 2026
HomeBreaking Newsअरेच्चा...१२ वेळा बत्ती गुल,उद्योजक त्रस्त......!

अरेच्चा…१२ वेळा बत्ती गुल,उद्योजक त्रस्त……!

•MIDC व निळापुर परीसरात विजेचा लपंडाव. •उद्योजकांमध्ये असंतोष, महावितरण विभाग निद्रावस्थेत.

अजय कंडेवार,वणी :– तालुक्यातील एमआयडीसी व निळापुर रोडवरील महासोया औद्योगीक वसाहतीमध्ये विजेचा लपंडाव खूप जोमात सुरू आहे. २० दिवसामध्ये १२ वेळा बत्ती गुल झाल्यामुळे उद्योजक त्रस्त झाले आहेत. याचा परिणाम व्यवसायीकांना विजपुरवठा खंडीत झाल्यामुळे जनरेटरचा वापर करावा लागत आहे. डिझेलसाठी लाखो रूपयांचा भुर्दंड सहन करावा लागत असल्यामुळे उद्योजकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. याचे मुख्य कारण म्हणजे वणी महावितरण विभागाचे सुस्त असलेले कर्मचारी व अधिकारी आहेत.

औद्योगीक वसाहतीमध्ये वणी एमआयडीसीचा समावेश आहे. जवळ असल्यामुळे कृषी माल व इतर वस्तूंचा साठा करणारी अनेक उद्योग या परिसरामध्ये आहेत. याशिवाय इतर अनेक महत्वाचे कारखाने या परिसरात आहे. एमआयडीसीमधील समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. यामध्ये विजेचा लपंडावाचाही समावेश आहे.विजपुरवठा कधी खंडीत होईल याचा काहीच भरोवसा राहिलेला नाही.मागील २० दिवसामध्ये १२ वेळा अशाप्रकारे लपंडावाला सामोरे जावे लागते आहे. कधी १० ते १५ मिनीट तर कधी १ ते २ तास बत्तीगुलची स्थिती असते.उत्पादनावरही परिणामविजेच्या लपंडावामुळे माहासोया व इतर MIDC चालकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. इतर कारखान्यांमधील उत्पादनावरही परिणाम होऊ लागला आहे. विद्युत पुरवठा खंडीत झाल्यानंतर कामकाज ठप्प होते व मोठे आर्थिक नुकसान होत असल्यामुळे विद्युतपुरवठा सुरळीत होईल यावर लक्ष द्यावी अशी मागणी उद्योजकांनी केली आहे.

बॉक्स….

•एक्सप्रेस एचटी फीडर काय आहे….

सबस्टेशनमधून पुरवठा कोणत्याही टॅपिंगशिवाय एकाच उद्योगाला जातो आणि विद्युत प्रवाह 24×7 प्रभावी असतो, त्याला एक्सप्रेस एचटी फीडर म्हणतात. त्यामुळे उद्योगांना सतत विनाव्यत्यय पुरवठा होतो. पण वणी येथील एमआयडीसी व निळापुर रोडवर असलेल्या उद्योगांना अखंड वीज हे नाममात्र झाली आहे कारण बऱ्याच वेळा संवेदनशील आणि सतत वीज वापरणाऱ्या आणि उत्पादन प्रक्रियेत वीज खंडित झाल्यास प्रचंड नुकसान सहन करणाऱ्या उद्योगांना अखंड वीज लागते. साधारणपणे फीडरशी जोडलेले सर्व HT ग्राहक हे वारंवार वीज ट्रिपिंगमूळे डिझेलसाठी लाखो रूपयांचा भुर्दंड सहन करावा. यावरून स्पष्ट चित्र असे की महावितरण विभाग हा कोमात असल्याने याचे भुर्दंड मात्र येथील उद्योगांना मोठ्या प्रमाणात सहन करावा लागत आहे.याशिवाय इतर अनेक महत्वाचे कारखाने या परिसरात आहे. एमआयडीसीमधील समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. यामध्ये विजेचा लपंडावाचाही समावेश आहे.”

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page