•वणी पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा यांची संयुक्तरित्या कारवाई
अजय कंडेवार,वणी : शहरातील मोटारसायकल चोरी करणाऱ्या सराईत चोरट्याला अटक करण्यात वणी पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. या आरोपीकडून चार मोटारसायकल असा एकूण एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
बिट्टू उर्फ नितीनने वणी पोलिस परिसरातील दुचाकी चोरींचा गुन्ह्यांची कबुली दिली.त्यावरून L.C.B पथक व वणी पोलीसने सराईत चोरटा नितीन उर्फ बिट्टु नथ्थुजी मारबते (वय 24 वर्ष),चंद्रपूर जिल्ह्यातील जिजामाता नगर,नांदा फाटा, कोरपना असे अटक केलेल्याचे नाव आहे.मोटरसायकल क्र.MH-34-BU-03430 अज्ञात चोरटा घेऊन पसार झाला होता. याबाबत वणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखलही झाला होता. परंतु ही दुचाकी चंद्रपूर जिल्ह्यात असल्याचे महिती मिळताच P.I अजित जाधव यांनी सूचना दिल्या असता.LCB व वणी पोलीस पथकाने चक्रे फिरवीत अनेक विश्लेषणाच्या मदतीने या आरोपीला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली व विविध ठिकाणावरून चोरीस गेलेल्या काळ्या रंगाची होंडा कंपणीची अॅक्टिवा, क्र.MH-34 BU- 0343 ,काळ्या रंगाची हिरो होंडा स्प्लेंडर विना क्रमांकाची, टाळल्या रंगाची हिरो होंडा स्प्लेंडर विना क्रमांकाची,लाल व चंदेरी हिरो, आयस्मार्ट MH -29-AP.-4783असे एकूण चार दुचाकीही हस्तगत करीत 1लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कारवाई DYSP गणेश किंन्द्रे,P.I आधारसिंग सोनोने (L.C.B यवतमाळ) व P.I अजित जाधव यांचे मार्गदर्शनाखाली, LCB पथक वणी, विकास धडसे,सुधिर पांडे, शुभम सोनूले, सुनील नलगंटीवार, सागर सिडाम यांनी पार पाडली.