Tuesday, February 17, 2026
HomeBreaking Newsअखेर... वणीत डॉ. महेंद्र लोढा यांनीं IMA ला कायमस्वरूपी जागा उपलब्ध दिलीच.....!

अखेर… वणीत डॉ. महेंद्र लोढा यांनीं IMA ला कायमस्वरूपी जागा उपलब्ध दिलीच…..!

•डॉक्टर्स डे निमित्त रक्तदान शिबिर व विविध कार्यक्रमांची रेलचेल.... •रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन- अध्यक्ष डॉ. शिरीष कुमरवार 

Ajay Kandewar,Wani : येथील इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) शाखेतर्फे सोमवारी दिनांक 1 जुलै रोजी डॉक्टर्स डे निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, पोस्टर प्रदर्शनी, कार्यशाळा आणि IMA च्या नवीन हॉलचे उद्घाटन यांचा समावेश आहे. रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन IMA वणीचे अध्यक्ष डॉ. शिरीष कुमरवार यांनी वणीकरांना केले आहे.

कार्यक्रमाची सुरुवात वृक्षारोपणाने होणार आहे. स. 9 वाजता ग्रामीण रुग्णालयात IMA चे पदाधिकारी व सदस्य वृक्षारोपण करतील. स. 9:30 वाजता बस स्टँडसमोर IMA च्या नवीन हॉलचे उद्घाटन होईल. डॉ. महेंद्र लोढा यांनी कायमस्वरूपी ही जागा संस्थेसाठी उपलब्ध करून दिली आहे. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून एसडीओ नितीन हिंगोले तर महाराष्ट्र IMA चे पदाधिकारी डॉ. मंगेश गुलवाडे हे अध्यक्ष राहतील. प्रमुख पाहुणे म्हणून वणी नगर परिषदचे मुख्याधिकारी डॉ. सचिन गाडे, तहसीलदार निखिल धुळधर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. समीर थेरे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. धर्मेंद्र सुलभेवार उपस्थित राहतील.उद्घाटनानंतर लगेच IMA हॉलमध्ये रक्तदान शिबिराला सुरूवात होईल. या शिबिरात वणीकरांसह, वणीतील डॉक्टर व त्यांचे कुटुंबीय देखील रक्तदान करणार आहेत. नागपूर येथील लाईफलाईन ब्लड बँकेच्या सहकार्याने हे शिबिर होत आहे.

डॉक्टर महेंद्र लोढा यांच्या स्वमालकीची जागा इंडियन मेडिकल असोसिएशनला (IMA) ला सुपूर्द……

मागील अनेक वर्षापासून इंडियन मेडिकल असोसिएशन वणी शाखा कार्यक्रम घेत आहे. परंतु कार्यक्रम किंवा कार्यशाळा घेण्यासाठी असो त्यांना अशी स्व-हक्काच हॉल किंवा साधी जागा देखील उपलब्ध होत नव्हती.त्यामुळ दरवर्षी इंडियन मेडिकल असोसिएशनला स्व-हक्काचा जागेसंदर्भात पायपीट करावी लागली. परंतु त्यांना कुठेही नगरपरिषदने असो अन्य संस्था असो कोणत्याही संस्थेला मागणी करूनही शेवटी IMA वणी शाखेला निराशाच पदरी पडत गेल्या.त्यामुळे वणी येथील सुप्रसिध्द डॉक्टर महेंद्र लोढा यांनी पुढाकार घेत स्वतःच्या मालकीचा हॉल IMA वणी शाखेला उपलब्ध करून देत संस्थेला सुपूर्द करण्याचा निर्धार केला.या निर्णयाचे वैद्यकिय क्षेत्रातून स्वागत तसेच कौतुक केल्या जात आहे.

• निरोगी आरोग्यासाठी पोस्टर प्रदर्शनी….

WHO च्या 2025 च्या थीम “निरोगी सुरुवात, आशादायी भविष्य” (Healthy Beginnings, Hopeful Futures) नुसार विद्यार्थ्यांसाठी पोस्टर मेकिंग स्पर्धा आयोजित आहे. या पोस्टरची प्रदर्शनी हॉलमध्ये लावली जाईल आणि मान्यवरांकडून निकाल जाहीर होईल. 

ब्लड ट्रान्सफ्युजन यावर कार्यशाळा…

रक्त संक्रमन ही एक महत्त्वाची व जबाबदारीची प्रक्रिया आहे. त्यामुळे नर्स व मेडिकल स्टाफसाठी ब्लड ट्रान्सफ्युजन यावर IMA हॉल येथे दु. 4 वाजता कार्यशाळा होणार आहे. तर रात्री 9 वाजता IMA सदस्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. लाईफलाईन ब्लडचे डॉ. हरीष वर्भे व डॉ. विराज वर्भे हे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. 

IMA वणीचे अध्यक्ष डॉ. शिरीष कुमरवार, सचिव डॉ. संकेत अलोणे, उपाध्यक्ष डॉ. सुनील जुमनाके, सहसचिव डॉ. स्वप्निल गोहोकर आणि पदाधिकारी यांनी रक्तदान शिबिर व इतर सर्व आयोजित कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले .

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments