Saturday, May 30, 2026
HomeBreaking Newsअक्षय भैया, मीनाक्षी दीदी आगे बढो...हम तुम्हारे साथ है....!

अक्षय भैया, मीनाक्षी दीदी आगे बढो…हम तुम्हारे साथ है….!

Ajay Kandewar,Wani:- आगामी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग 10 मध्ये शिवसेना शिंदे गटाचे अक्षय बोथरा व मीनाक्षी राजू साठे या नगरसेवकांचा प्रचार जोरदार गतीने सुरू असून, मतदारांकडून मिळणारा प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता शिंदे सेना या प्रभागात आघाडीवर असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.

नगराध्यक्ष पदापासून नगरसेवक-नगरसेविका पदांपर्यंतच्या सर्व उमेदवारांना नागरिकांची ठोस पसंती मिळत असल्याचे वातावरण असून, प्रत्येक सभेत वाढणारी गर्दी याची साक्ष देत आहे. शिंदे सेनेच्या प्रचार सभांना, कॉर्नर सभांना, रॅलींना आणि घरदार जनसंवादाला मिळणारा ओसंडून वाहणारा प्रतिसाद पक्ष कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करीत आहे.या बैठकींना मिळणारी गर्दी पाहता शिंदे गटाचे संघटन आणि जनाधार आणखी मजबूत होत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. प्रभाग १० मधील अक्षय बोथरा व मीनाक्षी राजू साठे यांच्या लोकप्रियतेसोबतच सक्रिय कामकाजामुळे पक्षाच्या विजयी समीकरणाला निश्चितच बळ मिळत आहे. एकूणच, वणी नगरपरिषद निवडणुकीत शिंदे गटाची लाट वाढत असून युवाशक्ती आणि कामकाजाची पारदर्शकता हे त्यांचे मुख्य आकर्षण ठरत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page