Sunday, August 30, 2026
HomeBreaking Newsवणीतील रणांगणात भाजपची ताकद फुल फॉर्ममध्ये…..!

वणीतील रणांगणात भाजपची ताकद फुल फॉर्ममध्ये…..!

•विरोधकांची उमेदच हरवणार ?

Ajay Kandewar,Wani:- वणी शहरात निवडणुकीची धुरा तापत असताना, भाजपने अचानक गती पकडत संपूर्ण राजकीय वातावरणात खळबळ उडवली आहे. शिस्तबद्ध कार्यपद्धती, नियोजनबद्ध रणनीती आणि संघटित प्रचारयंत्रणा यासाठी ओळखली जाणारी भाजप आता वणी नगरपरिषद निवडणुकीतही तुफानी झेप मारताना दिसत आहे.माजी आमदार संजीवरेड्डी बोदकूरवार यांच्या नेतृत्वात भाजप शहराध्यक्ष अ‍ॅड. निलेश चौधरी यांनी प्रत्यक्ष प्रचाराची जबाबदारी हाती घेत “प्रत्येक मतदार – प्रत्येक उमेदवाराशी थेट संपर्क” ही योजना जोरात राबवली. कोणताही वेळ वाया न घालवता रस्त्यापासून गल्लीपर्यंत, घराघरात पोहोचत भाजपने केलेला नियोजनबद्ध प्रचार हा सध्या विरोधकांच्या चिंतेचा विषय ठरत आहे.

शहरात चर्चेचा विषय ठरलेला हा दौरा माजी आमदार संजीवरेड्डी बोदकूरवार यांच्या नेतृत्वात होत असून, त्यांच्या नेमक्या मार्गदर्शनामुळे भाजपचा प्रचार आणखी धारदार बनला आहे. रोज वाढणारी उपस्थिती, तरुणांचा उत्साह आणि प्रत्येक प्रभागात भाजपचा वाढता प्रभाव पाहता विरोधकांच्या खेम्यात मात्र स्पष्ट बेचैनी वाढलेली दिसते.विरोधकांकडे अजूनही ठोस रणनीती नसताना भाजपची अशी अचानक आणि आक्रमक झेप म्हणजे त्यांच्या डावपेचांवर गदा असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे.वणी मध्ये भाजपाचा नियोजनबद्ध आणि शिस्तबद्ध प्रचार विरोधकांच्या रात्रीची झोप उडवणारा ठरतोय…!

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page