•एकूण 96 हजार 320 रू मुद्देमाल जप्त.
अजय कंडेवार,वणी : होळी आणि धुलीवंदन यानिमित्त संपूर्ण जिल्ह्यामध्ये पोलीस विभागाच्या वतीने शासनाने बंदी घातलेली गावठी दारू तसेच इतर प्रकारची दारू विकल्या जाऊ नये यासाठी संपूर्ण जिल्हाभर बंदीचे आदेश देऊन ज्या ठिकाणी दारू दिसेल किंवा अवैध धंदे दिसेल त्या ठिकाणी कारवाई करा असे आदेश दिले होते. त्या आदेशाच्या अनुषंगाने शिरपूर पोलीसांनी वेगवेगळ्या ठिकाणी धाडसत्र राबवित एकूण 15 केसेस पूर्ण करून एकूण 96 हजार 320 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.(Shirpur police seized 15 cases, thousands worth of liquor)

ग्रामीण पोलीस स्टेशन याशिवाय जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन अंतर्गत वेगवेगळ्या ठिकाणी पोलीस विभागाच्या वतीने विशिष्ट पोलीस पथक तयार करून त्यांच्या माध्यमातून धाडी घातल्या आहेत यातील शिरपूर पोलीस स्टेशन हद्दीत धाडसत्र राबवित 4 जुगार धाड तर अवैध दारू 11 केसेस असा एकूण 96 हजार 320 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदरची कार्यवाही डॉ.पवन बन्सोड पोलीस अधीक्षक यवतमाळ,पियुष जगताप अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ,संजय पुज्जलवार उप.वि.पो.अ.वणी यांचा मार्गदर्शनात शिरपूर ठाणेदार गजानन करेवाड , ए.एस.आय रामेश्वर कांडूरे,प्रवीण गायकवाड,सुनील दुबे, सुगाद दिवेकर,निलेश भुसे,अमोल कोवे,पाटील,राजन इसनकर,विजय फुलके व अभिजित कोशटवार यांनी केली.


