Ajay, Wani: वणी शहरात मागील एका सरपंच संघटनेचा जिल्हाध्यक्ष शिंदे गटाला लागला म्हणून आता ‘अनेक सरपंच शिंदेसेनेच्या वाटेवर’ अशी हवा जोमात तयार केली जाते; पण प्रत्यक्ष प्रवेश सोहळ्यात मंचावर दिसणारी संख्या पाहिली की राजकीय गणितापेक्षा गाजावाजाच मोठा होता.असा सवाल राजकीय गोटातून ऐकावयास येत आहे. सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष यांच्यासह केवळ ३ सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी शिंदेसेनेत प्रवेश केल्याचा काही माध्यमातून झडकल्या पण “तो” प्रवेश केवळ ‘prestige’ ठेवण्यासाठी ‘जंगी’ वाटत असला तरी त्यात अपेक्षेपेक्षा ‘कमी सरपंच’ गटात एन्ट्री झाल्याने शिंदेसेनेचा त्या सोहळ्याचा “फुगा फुटला का?” अशी चर्चा ऐकावयास येत आहे. कारण सरपंच संघटनेचा जिल्हाध्यक्ष आणि त्यातही केवळ 2 ते 3 सरपंच शिवसेनेचा गळाला हा ही एक महत्वाचा प्रश्न उपस्थित झाला आहे.
१०१ सरपंचांचा तालुका; प्रवेश मात्र दोन तीनच सरपंचाचा..?
वणी तालुक्यात तब्बल १०१ सरपंच असताना त्यातील केवळ मोजक्या सरपंचांच्या प्रवेशाला ‘मोठे राजकीय इनकमिंग’ म्हणून सादर केले जात असेल, तर ‘मोठे’ नेमके कशाच्या आधारावर? हा प्रश्न आता उपस्थित होणे साहजिक आहे. सरपंच संघटनेच्या जिल्हाध्यक्षांचा पक्षप्रवेश ही निश्चितच राजकीय हवा फुस्स करणारी आहे.
‘जिल्हाध्यक्ष’ आले, पण सरपंचांचा लोंढा कुठे?
जेव्हा जिल्हाध्यक्ष बाबत आधी राजकारणात वातावरण निर्माण करणे आणि प्रत्यक्ष संघटन उभी करणे यात फरक असतो. मात्र एका संघटनेच्या जिल्हाध्यक्षांच्या प्रवेशाला संपूर्ण सरपंच वर्गाचा राजकीय कल म्हणून रंगवणे कितपत योग्य? याचे उत्तर आकडेच देतात.दरम्यान, माथनकर यांच्या पूर्वीच्या राजकीय भूमिकेबाबत आणि आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या संभाव्य “तिकीट” समीकरणांबाबत स्थानिक राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असल्याचे सांगितले जाते. जिल्हा परिषद निवडणुकीतील उमेदवारीच्या “गणितामुळे ” हा प्रवेश झाला, हा दावा मात्र संबंधितांकडून अधिकृतरीत्या स्पष्ट झालेला नसल्याने तो सध्या राजकीय चर्चेपुरताच मर्यादित आहे. त्यामुळे शिंदेसेनेला या प्रवेशातून संघटनात्मक किती फायदा झाला आणि केवळ एका पदाधिकाऱ्याच्या प्रवेशाला किती मोठे राजकीय रूप दिले गेले. हे या प्रवेशातून स्पष्ट झाले.

