Ajay Kandewar,वणी:- तालुक्यात पंचायत समिती माध्यमातुन १०१ गावामध्ये १०९३५ घरकुल मंजुर केलेले आहे. सन २०२४ मथिल ५ ब्रास वाळू वाटप डेपोधोरण अपयशी झाले. यामध्ये मागील वर्षी व चालु वर्षातील वाळु अभावी अनेक बांधकाम जोता लेवल व स्लॅब लेवेल पर्यंत यामध्ये ४७११ बांधकाम अजूनपर्यंत सुरु होऊ शकले नाही. घरकुल बांधकामासाठी राहते घर जागा साफ करून नविन घरकुल बांधकाम मोकळी केली बांधकाम लागणारे लोखंड, गिट्टी, सिमेंट शासन जियी व कर्ज काढून घरकुल मुदतीत बांधायचे म्हणुन साहित्य घेतले. घरकुल लाभार्थी कोणी गुराच्या गोठ्यात, कोणी मोकळ्या जागेवर पाल टाकुन परिवारासह राहत आहे. वणी तालुक्यात वर्धा, पैनगंगा, निगुर्डा नदित मोठ्या प्रमाणात वाळू साठा उपलब्ध असुन लिलाव न झाल्यामुळे घरकुल लाभार्थ्यांना नाईलाजाने पावासाळापुर्वी घर बांधायचे म्हणुन चोरीची वाळु ७,००० हजार रुपये ब्रासने घ्यावी लागल्याने बांधकाम खर्च वाढला आहे. नविन वाळु धोरण २०२५ मध्ये वाळु उत्खनातुन महसुल मिळवणे हा उद्देश नसून घरकुल धारक व विकास काम सहज सुलभ वाळु उपलब्ध व्हावी,असे धोरणात सांगते.

परंतु वस्तु स्थिती तशी नाही. पावसाळ्यात सिमेंट ओले होवुन नुकसानीची शक्यता पावसाळ्यामध्ये अपुर्ण बांधकाम असणारे लाभार्थी कुठे राहणार दरवर्षी नैसर्गीक आपत्ती मध्ये नदी काठावरील अनेक गांव पुरामध्ये पाण्याखाली २ ते ३ दिवस राहतात. वाळु मिळत नसल्याने घरकुल लाभार्थ्यांमध्ये प्रशासनाबद्दल प्रचंड नाराजी व असंतोष आहे. तालुक्यामध्ये ज्या घाटांना अनुमती प्राप्त आहे व जे घाट लिलावा मध्ये गेलेले नाही. अशा वाळु घाटामधुन घरकुल लाभार्थ्यांना ५ ब्रास वाळू गटविकास अधिकारी यांच्याकडुन पात्र लाभार्थी यादी प्राप्त करुन जवळच्या घाटातुल महसुल विभागाने ऑनलाईन पासेस व्दारे स्वामित्वधन न आकारता उपलब्ध करुन द्यावे. घरकुल लाभार्थ्यांला अतिशिघ्र वाळू मिळून स्वताच्या निवाऱ्यात राहण्यासाठी संधी मिळावी या करीता हक्काची ५ ब्रास मोफत वाळु देण्यात यावी या मागणी साठी माजी जी प सदस्य विजय पिदुरकर यांनी केली.यासाठी चारगाव – शिरपुर निर्गुडा नदीपात्रात वाळू सत्याग्रह आंदोलन दि.15 ला होणारं आहे . समस्त घरकुल लाभार्थी यांनी या वाळू सत्याग्रह आंदोलनात सहभागी व्हावे,असे आवाहन करण्यात आले आहे.

