Ajay Kandewar,Wani:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून वणी विधानसभा मतदारसंघातील वागदरा (जुना) गावातील शेकडो महिला, पुरुष व युवा कार्यकर्त्यांनी मनसेमध्ये जाहीर प्रवेश केला. मनसे नेते राजू उंबरकर यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या पक्षप्रवेश सोहळ्यामुळे वागदऱ्यासह वणी तालुक्यात मनसेचं इंजिन आणखी वेगाने धावू लागल्याचं चित्र आहे.

गावात इंजिनने एंट्री घेताच “बोग्या सर्व फुल” अशा थाटात ग्रामस्थांची खचाखच भरती झाली. वणी शहरातही इंजिन सुसाट चालू लागल्याने विरोधकांमध्ये खळबळ माजली आहे. वागदऱ्याच्या या प्रवेशामुळे वणीच्या राजकारणात मनसेकडे समीकरण झुकत असल्याचे स्पष्ट होत आहे.
या इंजिनच्या जोरदार धावण्यात सर्वात महत्त्वाची भूमिका राजूभाऊ उंबरकर निभावत असून, त्यांची जनसंपर्कशैली आणि नेतृत्वगुण यामुळे पक्षात दिवसेंदिवस नवी भर पडते आहे. त्याचप्रमाणे फाल्गुन गोहोकर व अंकुश बोढेकर हे स्थानिक युवा मनसेच्या इंजिनचे विशेष चालक बनून कार्यकर्त्यांना योग्य मार्गदर्शन करत आहेत. त्यामुळे या इंजिनची गती वाढत असून, आगामी काळात वणी विधानसभा मतदारसंघातील मनसेचे इंजिन राजकीय मैदानावर भक्कम झेप घेणार यात शंका नाही.मनसेला मिळणारा वाढता जनसमर्थनाचा प्रतिसाद पाहता वणीतील राजकीय दिशा बदलण्याची चिन्हे आता स्पष्ट झाली आहेत.
यावेळी पक्ष प्रवेश सोहळ्याला राम ठमके, रामदास निखाडे, शुभम हुलके, आकाश राजुरकर, सूरज पाचभाई, गौरव बरडे, धनंजय खनगण, प्रकाश वैद्य, आलोक खनगण, प्रफुल उपाध्ये, आशिष वाभिटकर, निलेश जाधव, तसेच गावातील इतर प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

