Ajay Wani:- वणी शहरात अमली पदार्थांच्या वाढत्या जाळ्यावर P.I भानुदास पिदूरकर यांचा मार्गदर्शनात निर्णायक प्रहार करत वणी ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक (PSI) सुयोग महापुरे यांच्या तपासाखाली सुरू असलेल्या एमडी (Mephedrone) प्रकरणाने वणीचा MD चा गुन्हेगारीत चांगलीच घाबरघुंडी उडालेली आहे.न्यायालयात सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांनुसार MD तस्करी प्रकरणात आतापर्यंत 7 आरोपींना अटक करण्यात आली असून, एक फरार आरोपीचा शोध सुरू आहे.
या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे सौरभ दिनेश खैरे (25),प्रथमेश विनोद गुंडेवार (20),प्रज्योत महेश उपरे,अक्षय उर्फ गोलू माधव पेचे (27),अविनाश विजय पाटील (42),रविंद्र धनराज गुप्ता (34)अक्रम उर्फ बबलू कमरुद्दीन सय्यद (25),तसेच युसुफ (पूर्ण नाव उपलब्ध नाही) हा आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे.या कारवाईदरम्यान पोलिसांनी २३.५४ ग्रॅम एमडी (Mephedrone), आठ मोबाईल फोन, रोख रक्कम आणि दुचाकी असा लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तपासात आरोपींच्या आर्थिक व्यवहारांसह पुरवठा साखळीचाही माग काढला जात आहे.PSI सुयोग महापुरे यांच्या नेतृत्वाखाली पथकांनी तपासाची चक्रे वेगाने फिरत असून, आरोपींच्या संपर्कातील इतर संशयितांवरही पोलिसांचे लक्ष केंद्रीत आहे. त्यामुळे वणीतील ड्रग्ज नेटवर्कला मोठा धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
वणी शहरात अमली पदार्थांविरोधात सुरू असलेल्या या कारवाईमुळे ड्रग्ज व्यवसाय करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, ठाणेदार भानुदास बिदरकर यांचा वचक गुन्हेगारावर आवरताना दिसत आहे.पुढील काही दिवसांत आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

