Ajay Kandewar,Wani:- वणीच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप होण्याची चिन्हे दिसत आहेत. हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते आणि अनेक प्रभावशाली नेते शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
अलीकडेच वणीतील भाजपचे प्रदेश सदस्य विजय चोरडिया यांनी शिंदे गटात प्रवेश करून राजकीय समीकरणात मोठा बदल घडवून आणला होता. आता तर आणखी काही “मोठे मासे” शिंदे सेनेच्या गळाला लागल्याची चर्चा असून, विरोधी पक्षांचे पाय थरथरायला लागले आहेत.“डबल V फॅक्टर” विजय आणि विश्वास या नावांच्या जोडीने सध्या वणीच्या राजकारणात गारुड निर्माण केले आहे. शिंदे गटाने एकामागून एक हालचाली करून विरोधकांना कोपऱ्यात ढकलले आहे.येत्या नगरपरिषद, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये या हालचालींचा मोठा परिणाम दिसून येईल, अशी राजकीय वर्तुळात कुजबुज आहे. काहींनी तर स्पष्ट म्हटलं आहे की शिंदे गट आता फक्त खेळ खेळत नाही, मैदान ताब्यात घेतो आहे.एका मागून एक धक्के देत शिंदे गटाने वणीच्या राजकारणात नवी उर्जा भरली आहे.हजारोंच्या संख्येने प्रवेशाची तयारी सुरू असून, आणखी काही मोठे मासे शिंदे सेनेच्या जाळ्यात अडकणार असल्याची खात्री राजकीय सूत्रांनी दिली आहे.
•वणीतील विरोधक मात्र गोंधळलेले.….
कोणता गट टिकणार आणि कोणाचा गोट उडणार याची चर्चा गल्लीबोळात सुरू आहे.भाजप, उबाठा ,काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांना आता खिंडार लागल्याशिवाय पर्याय नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे.“V फॅक्टरचा जादू” सध्या वणीभर चर्चेत असून, येत्या काही दिवसांत शिंदे गटाची ग्रॅण्ड एन्ट्री होताच राजकीय समीकरणे कोलमडणार आहे. विरोधकांनी अजून मोर्चेबांधणीही सुरू केलेली नाही, आणि शिंदे गटाने थेट मैदानात झेंडा रोवला आहे.वणीचे राजकारण आता “Game Over Mode” मध्ये गेल्याचे स्पष्ट दिसते.

