Saturday, October 24, 2026
HomeBreaking Newsवणी विधानसभेत मनसेच "इंजन"फुल स्पीडवर .....

वणी विधानसभेत मनसेच “इंजन”फुल स्पीडवर …..

• समीकरणे पालटण्याची चिन्हे • फाल्गुन जोशात पक्षात नवचैतन्य.

Ajay kandewar,Wani:- स्थानिक निवडणुका जवळ येत असताना वणी विधानसभेच्या राजकारणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने प्रचंड वेग पकडला आहे. मारेगाव, झरी, तसेच वणी शहरासह ग्रामीण भागात मनसेच्या पक्षात मोठ्या प्रमाणावर प्रवेश होताना दिसत आहे. त्यामुळे वणी तालुक्यात मनसेचे “इंजन” खऱ्या अर्थाने धावू लागले आहे.

मनसे नेता राजू उंबरकर यांच्या मार्गदर्शनात मनसे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकर यांच्या अथक मेहनतीने संघटनात्मक बांधणीला वेग आला आहे. तर राजूभाऊ उंबरकर यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनामुळे कार्यकर्त्यांच्या उत्साहाला नवे पंख मिळाले आहेत. परिणामी, गावपातळीवर मनसेचा झेंडा नवा जोश घेऊन फडकताना दिसतो आहे.अनेक समाजघटकांचा सहभाग, तरुणांचा वाढता विश्वास आणि स्थानिक प्रश्नांवर घेतलेली ठाम भूमिका यामुळे वणी विधानसभेत मनसेकडे झुकते राजकीय समीकरण स्पष्टपणे जाणवू लागले आहे. ग्रामीण भागात तसेच शहरात पक्षाचे प्रभावी दौरे सुरू असून, कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेल्या आत्मविश्वासामुळे विरोधकांची डोकेदुखी वाढली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या प्रवेशांच्या लाटेमुळे मनसेचे संघटन अधिक मजबूत झाले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत वणी विधानसभेत मनसेचे इंजिन निर्णायक ठरणार, असा ठाम विश्वास कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त केला जात आहे.“इंजन आता फुल स्पीडवर आहे; पुढची निवडणूक ही मनसेसाठी गेम-चेंजर ठरेल” अशी कार्यकर्त्यांची ठाम भूमिका असून, वणी विधानसभेत मनसेचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत आहे.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page