Thursday, June 11, 2026
HomeBreakingरणधीर साहेब......चारगाव चौफुलीचे ‘स्टेअरिंग’ फिरवणार की फक्त कॅबिनची खुर्ची....

रणधीर साहेब……चारगाव चौफुलीचे ‘स्टेअरिंग’ फिरवणार की फक्त कॅबिनची खुर्ची….

Ajay Kandewar Wani : अवधूतवाडी पोलीस ठाण्यातून थेट वणी वाहतूक शाखेच्या केबिनमध्ये दाखल झालेल्या नव्या वाहतूक शाखाप्रमुख नरेश रणधीर कडे सध्या सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. कारण लालपुलिया, वणी शहरातील वाहतुकीचा बोजवारा आणि चारगाव चौफुलीसारख्या संवेदनशील ठिकाणांची बिकट परिस्थिती आता लपून राहिलेली नाही.

चारगाव चौफुलीवर नुकत्याच झालेल्या भीषण अपघातात एका बापाचा दुर्दैवी मृत्यू झाला.घटनेचे स्वरूप इतके भयावह होते की ते दृश्य पाहून सामान्य नागरिकांच्या डोळ्यात पाणी आले. मात्र या घटनेनंतरही रस्त्याच्या कडेला उभे असलेले अवजड ट्रक, चौफुलीत निर्माण होणारी वाहतूक कोंडी आणि जीवघेणी बेफिकिरी कायम आहे.म्हणूनच आता प्रश्न उपस्थित होत आहे की, वाहतूक शाखा प्रमुख रणधीर हे वाहतूक शाखेचे स्टेअरिंग खऱ्या अर्थाने हातात घेणार की फक्त कार्यालयातील खुर्चीचेच स्टेअरिंग सांभाळणार.

चारगाव चौफुली, चिखलगाव रोड लालपुलिया परिसरातील रस्त्यांच्या कडेला उभे राहणारे ट्रक आता वाहन नसून “फिरते मृत्यूदूत” बनले आहेत. अपघातानंतर दोन दिवस कारवाईचे फोटो आणि नंतर पुन्हा ‘जैसे थे’ अशीच परंपरा सुरू राहणार की खरोखरच कठोर मोहीम उभी राहणार. वणी वाहतूक शाखेची ओळख आजपर्यंत अनेकांना “वाहतूक नियंत्रण शाखा” पेक्षा “वाहतूक निरीक्षण शाखा” म्हणूनच जास्त झाली आहे. नियमभंग करणारे वाहनचालक, चौफुलीत उभे ट्रक आणि बेशिस्त पार्किंग हे सर्व उघड्या डोळ्यांनी दिसत असतानाही कारवाई मात्र अनेकदा दुर्बिणीतून शोधावी लागते.P.I.रणधीर यांची खरी कसोटी आहे ती चारगाव चौफुलीची व लालपुलिया परिसरातील कारण इथे फक्त वाहतूक नाही, तर थेट जीवांचा प्रश्न आहे. एखादा अपघात झाल्यावर पंचनामा करणे सोपे असते पण अपघात होण्याआधी कारणांवर लगाम लावणे हीच खरी वाहतूक शाखेची परीक्षा असते.त्यामुळे रणधीर साहेब चारगावच्या ‘यमदूत’ ट्रकांना हटवणार, की वाहतूक शाखेचे स्टेअरिंग फिरवत बसणार..,.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page