Tuesday, May 19, 2026
HomeBreaking“मी दोन्ही ठिकाणी एकटा कसा राहू...?” म्हणणाऱ्या डॉ.संदीप येडमे यांच्या वक्तव्याने आरोग्य...

“मी दोन्ही ठिकाणी एकटा कसा राहू…?” म्हणणाऱ्या डॉ.संदीप येडमे यांच्या वक्तव्याने आरोग्य विभागाचा गोंधळ उघड…..

Ajay Kandewar, Wani : यवतमाळ जिल्ह्यात वणी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांचा कारभार दिवसेंदिवस ढासळत चालल्याचे चित्र समोर येत असून आता कायर PHC प्रकरणाने आरोग्य विभागाचा भोंगळपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. माध्यमांनी संपर्क साधून विचारणा केली असता डॉ. यांनी ““मी दोन्ही ठिकाणी एकटा कसा राहू…?”माझं हेडक्वार्टर हे घोंसा आहे हा PHC माझ्याकडे अतिरिक्त आहे,” अशी प्रतिक्रिया दिल्याने संपूर्ण आरोग्य यंत्रणाच प्रश्नांच्या भोवऱ्यात सापडली आहे. मग काय जनतेला “मरणाच्या दारी सोडा सोडण्यासाठी” पीएचसी उघडलेत काय ? असा नागरिकांचा थेट प्रश्न निर्माण झालेला आहे.

तालुक्यात अनेक PHC मध्ये डॉक्टरांची कमतरता, मुख्यालयात अनुपस्थिती आणि रुग्णांची गैरसोय हे प्रकार सतत समोर येत असताना आता अधिकारी मात्र जबाबदारी झटकताना दिसत आहेत. “मी दोन्ही ठिकाणी एकटा कसा राहू…?” हे डॉक्टरांचे विधान धक्कादायक मानले जात असून मग अशा परिस्थितीत ग्रामीण भागातील रुग्णांचे आरोग्य नेमके कोणाच्या भरोशावर चालले आहे? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

विशेष म्हणजे, अतिरिक्त भार देऊन एका डॉक्टरकडून दोन-दोन केंद्रे चालवण्याचा प्रकार सुरू असल्याने THO आणि DHO यांच्या नियोजनाचा पूर्णपणे बोजवारा उडाल्याचे दिसून येत आहे यात जिल्हा परिषदेचे C.O पतकी काय करतील हे पाहणे महत्त्वाचे आहे.कागदोपत्री व्यवस्था दाखवून प्रत्यक्षात रुग्णांना वाऱ्यावर सोडले जात असल्याचा आरोपही आता जोर धरू लागला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page