Ajay,Wani: दुष्काळाच्या झळांनी होरपळणाऱ्या वणी तालुक्यातील महिला बचत गटांच्या मागे मायक्रो फायनान्स कंपन्यांचा वसुलीचा तगादा सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. त्यावरून विधान परिषद आमदार तथा शिंदे सेनेचे शिवसेना नेता बच्चुभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनात वणी उपतालुकाप्रमुख धीरज राजूरकर व उपतालुकाप्रमुख अनिल उलमाले यांनी वणी विधानसभेत मायक्रो फायनान्स व अवैध सावकारीचा ‘मुजोर गेंडुरगीटक्याना” धडा शिकवण्याचा निर्धार केलेला आहे.एकीकडे शेतकरी आणि ग्रामीण भागातील महिलांची आर्थिक परिस्थिती बिकट असताना दुसरीकडे कर्जवसुलीसाठी महिलांना त्रास दिला जात असल्याच्या तक्रारींमुळे संताप व्यक्त होत आहे. महसूलमंत्री यांनी मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या सक्तीच्या वसुलीविरोधात जिल्हाधिकाऱ्यांना कारवाईचे निर्देश दिले असतानाही वणी तालुक्यात अशा प्रकारांना आळा बसत नसल्याचे चित्र दिसत आहे.
शिवसेना शिंदे गटाचे वणी तालुका उपतालुकाप्रमुख धीरज राजूरकर व उपतालुकाप्रमुख अनिल उममाले यांनी मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या मनमानी वसुलीविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. महिला बचत गटांच्या सदस्यांना कर्जवसुलीसाठी धमकावणे, मानसिक त्रास देणे किंवा दबाव टाकणे असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशारा त्यांनी दिला आहे. महिलांच्या सन्मानाशी आणि त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्याशी खेळण्याचा अधिकार कोणालाही नाही, अशी ठाम भूमिका शिवसेना शिंदे गटाने घेतली आहे.
अन्याय सहन करू नका…. ‘मुजोर गेंडुरगीटक्याबद्दल “थेट शिवसेनेशी संपर्क साधा….
वणी तालुक्यातील सर्व महिला बचत गटांना आवाहन करताना धीरज राजूरकर व अनिल उममाले यांनी सांगितले की, मायक्रो फायनान्स कंपनीकडून कोणत्याही प्रकारचा सक्तीचा वसुलीचा तगादा किंवा त्रास दिला जात असल्यास महिलांनी घाबरून न जाता थेट आमच्याशी संपर्क साधावा. महिलांच्या तक्रारींची दखल घेऊन संबंधित प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल. संपर्क करण्याकरिता उपतालुकाप्रमुख धीरज राजूरकर 8788361305, उपतालुकाप्रमुख अनिल उलमाले 9011589302,चंद्रकांत घुगुल वणी विधानसभा समन्वयक 7350689968,निलेश भाऊ बेलेकर जिल्हा सचिव युवासेना 8888619503 यांच्याकडे तक्रार करावी.

