Ajay Wani : वाढदिवस म्हणजे केवळ शुभेच्छांचा सोहळा न ठेवता सेवाभावातून समाजाशी नाते अधिक घट्ट करण्याचा संकल्प मोहदा येथे प्रत्यक्षात उतरविण्यात आला. वणी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित विविध सेवाभावी उपक्रमांना ग्रामस्थ व कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी आणि सेवाभावाची भावना ठळकपणे अधोरेखित झाली.
मोहदा येथील शाळेतील विद्यार्थ्यांना फळे व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. अंगणवाडीतील चिमुकल्यांनाही फळवाटप करून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्यात आला. त्याचबरोबर वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार, चिमुकल्यांसाठी आपुलकीची सेवा आणि पर्यावरणासाठी जबाबदारी—अशा त्रिसूत्री सेवाभावातून हा वाढदिवस साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच वर्षा राजूरकर होत्या. माजी उपसरपंच सचिन रासेकर यांच्या आयोजनातून हा सेवाभावी उपक्रम पार पडला. मुख्याध्यापक बडखल सर, नागभिटकर सर, कल्याणकर सर, शाळा समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य शोभाताई टेकाम, अंगणवाडी सेविका लताबाई गाताडे, रेखा बोंडे, किरण सोयाम, निकास शेंडे, रामदास बोंडे, शंकर ढुमणे, भगवान कुमरे, गौरव नवले, राजकुमार वडस्कर, अरुण बोंडे, अनिल मेश्राम, शुभम किलो, रुपेश राजूरकर, निलकंठ हेपट, सुमित ढुमणे, शरद केळझरकर यांच्यासह भाजपा कार्यकर्ते व ग्रामस्थांची उपस्थिती होती. ‘वाढदिवसाचा आनंद सेवेतून’ हा संदेश देत मोहद्यात झालेल्या या उपक्रमाला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद सेवाभावाचीच पावती ठरला.

