Friday, April 17, 2026
Homeवणीभव्य त्रिशूल यात्रेत हजारो भाविक शिरपूर गडावर..

भव्य त्रिशूल यात्रेत हजारो भाविक शिरपूर गडावर..

•ना भूतो…. ना भविष्य अशी होती त्रिशूल यात्रा.

अजय कंडेवार, वणी:- महाशिवरात्री सणानिमित्त 18 फेब्रुवारी रोजी वणी तालुक्यातील शिरपूर गडावर हजारो भाविक दर्शनासाठी जातात. यावर्षी महादेव भक्तांच्या पुढाकाराने शिरपूर येथे “भव्य त्रिशूल” यात्रेचे आयोजन करण्यात आले होते आणि यशस्वीरित्या पार ही पडले.

समाज सहभागातून होणार्‍या या भव्य त्रिशूल यात्रेत शिव भक्तांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते वणी शहरातून महाशिवरात्री निमित्त काही वर्षांपूर्वी महादेव भक्तांंकडून मोठ्या भक्ती भावाने त्रिशूल यात्रा काढली जात होती. काळानुरूप ती प्रथा बंद पडली. तरी प्रत्येक भाविक आपापल्या परीने महादेवाची यात्रा मोठ्या प्रमाणात करीत असतात.

शिरपूर गडावर महाशिवरात्री निमित्त त्रिशूल यात्रेचे आयोजन समाज सहभागातून नियोजन पूर्वक करण्यात आले होते. विविध सामाजिक संघटना नियोजनबद्धरित्या आयोजित करण्यात आलेल्या त्रिशूल यात्रेत सहभागी होते. विषेश महिलाही भजन मंडळी स्वरूपात उपस्थित होत्या. ही त्रिशूल यात्रा 18 फेब्रुवारीला बसस्थानकापासून  सकाळी 9 वाजता निघून टिळक चौक, गांधी चौक, भगतसिंग चौक, रंगनाथस्वामी मंदिर, गोकुळनगर, लालगुडा चौपाटी पासून मंदर, चारगाव चौपाटी पासून निघून शिरपूरला पोहोचली .या यात्रा मार्गात शिवभक्तांचे जागोजागी स्वागत करण्यात आले.

या रॅलीत वणी विधानसभेचे आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार, माजी नगराध्यक्ष तारेन्द्र बोर्डे, माजी पं.स.सभापती संजय पिंपळशेंडे, श्रीकृष्ण जन्माष्टमीचे अध्यक्ष कुणाल चोरडिया,बाळा हिकरे, नितीन चहाणकर, नितीन वासेकर व अनेक भाविकांचा सहभाग होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page