Friday, June 5, 2026
HomeBreakingबेपत्ता पीयूष गटलेवार सुखरूप सापडला.....

बेपत्ता पीयूष गटलेवार सुखरूप सापडला…..

Ajay Kandewar, Wani : गेल्या सात दिवसांपासून बेपत्ता असलेल्या वणी शहरातील स्टेट बँक परिसरातील रहिवासी पीयूष राजेश गटलेवार (वय 17 वर्षे 8 महिने) याचा अखेर शोध लागला असून तो आदीलाबाद येथे सुखरूप आढळून आला आहे. 27 मे रोजी सायंकाळी सुमारे 7.40 वाजता तो घरातून बाहेर पडला होता. यापूर्वीही तो अधूनमधून कोणालाही न सांगता बाहेर जात असे आणि काही वेळाने किंवा दुसऱ्या दिवशी घरी परतत असे. मात्र यावेळी अनेक दिवस उलटूनही तो घरी न परतल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली होती. नातेवाईक, मित्रपरिवार आणि पोलिसांच्या मदतीने त्याचा सर्वत्र शोध घेण्यात आला, मात्र त्याचा कोणताही ठावठिकाणा लागत नव्हता.

दरम्यान, पीयूष वापरत असलेली Activa 6G (MH-29 BR-1161) ही स्कुटी रेल्वे स्टेशन परिसरात आढळून आल्याने प्रकरण अधिकच गूढ बनले होते. स्कुटी पोलिसांनी कुटुंबीयांच्या ताब्यात दिली होती. सोशल मीडियासह विविध माध्यमांतून पीयूषचा शोध घेण्यासाठी आवाहन करण्यात आले होते. अखेर काल, दिनांक 4 जून 2026 रोजी आदीलाबाद येथून एका व्यक्तीने कुटुंबीयांना फोन करून पीयूष तेथे असल्याची माहिती दिली. ही माहिती मिळताच कुटुंबीयांनी कोणतीही वेळ न दवडता तातडीने आदीलाबादकडे धाव घेतली.

आदीलाबाद येथे पोहोचल्यानंतर कुटुंबीयांनी पीयूषची ओळख पटवून त्याला ताब्यात घेतले आणि त्याची सुखरूपता निश्चित केली. तब्बल सात दिवसांच्या चिंतेनंतर मुलगा सुरक्षित असल्याचे पाहून कुटुंबीयांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page