Sunday, May 31, 2026
HomeBreaking Newsप्रशांत उर्फ छोटू भाऊंच्या जनसंपर्काचा जबरदस्त परिणाम....

प्रशांत उर्फ छोटू भाऊंच्या जनसंपर्काचा जबरदस्त परिणाम….

• सौ.सोनाली निमकर व रितिक मामिडवार यांना प्रचंड लोकसमर्थन. • प्रभाग क्रमांक 5 मध्ये अव्वल पसंतीत

Ajay Kandewar, Wani : वणी नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक ५ मध्ये सोनाली प्रशांत उर्फ छोटू निमकर व रितिक मामिडवार यांच्या प्रचारमोहीमेने जोरदार गती घेतली असून परिसरात अक्षरशः जनलाट उसळली आहे. दिवसभर सुरू असलेल्या दारोदार भेटींमध्ये महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच व्यावसायिक वर्ग यांच्याकडून सोनाली ताईंना मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहता या प्रभागात निवडणुकीची हवा त्यांच्या बाजूने फिरलेली दिसत आहे.

सोनाली ताईंच्या मागे उभा असलेला एक मोठा आधारस्तंभ म्हणजे त्यांच्या पतीचे जननायक व्यक्तिमत्त्व— प्रशांत उर्फ छोटू भाऊ निमकर. गेली अनेक वर्षे कोणत्याही वर्ग-व्यक्तीचा भेदभाव न करता गावातील प्रत्येकाच्या मदतीस धावून जाणाऱ्या छोटू भाऊंच्या समाजसेवेची छाप प्रभागात सर्वत्र दिसून येते. “आपल्या कामाने ओळख निर्माण करणारा नेता” म्हणून नागरिकांनी छोटू भाऊंवर दाखवलेला विश्वास आता थेट सोनाली ताईंच्या उमेदवारीवर परावर्तित होताना दिसतो.

प्रभागातील मुख्य समस्या— पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, प्रकाशव्यवस्था याबाबत ठोस भूमिका घेऊन त्या उपाययोजना करण्याचे आश्वासन देत आहेत. तर महिलांसाठी सुरक्षित पर्यावरण, युवकांना मार्गदर्शन, आणि वृद्धांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करण्याची ताईंनी जाहीर केलेली भूमिका नागरिकांना भावणारी ठरत आहे. दिवसेंदिवस वाढणारी गर्दी, प्रत्येक बैठकित उमटणारे घोषणांचे आवाज आणि स्थानिक नेतृत्वाचा ठाम पाठिंबा पाहता प्रभाग क्रमांक ५ मधील नागरिकांची “पहिली पसंती” म्हणून सोनाली प्रशांत उर्फ छोटू निमकर यांचे नाव ठामपणे पुढे येत आहे.वणी नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग ५ मधून सोनाली ताई जोरदार आघाडीच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे चित्र स्पष्ट दिसू लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page